नवी मुंबई

मोटार कार यांची फसवणुक / अपहार करणारे ०२ आरोपी अटक, ०५ गुन्हयांची उकल करून ३१ चार चाकी वाहने किमंत दोन कोटी दहा लाख रूपये किमतीची मालमत्ता हस्तगत करण्यात नेरूळ पोलीसांना यश

मा. पोलीस आयुक्त साो. श्री बिपीन कुमार सिंग, मा. सह पोलीस आयुक्त साो. डॉ. श्री. जय जाधव, मा. पोलीस उपआयुक्त श्री. सुरेश मेंगडे साो. परि – ०१ वाशी, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. भरत गाडे साो, तुर्भे विभाग, यांनी नागरीकांच्या फसवणुकीचे प्रमाणे वाढत असल्याने नमुद गुन्हे तात्काल उघडकीस आणण्याच्या दिलेल्या सुचनांनुसार मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शाम शिंदे यांचे मार्गदर्शनानुसार पो.नि. श्री. सुनिल गवळी (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरणाचे सपोनि राजेंद्र घेवडेकर, सपोनि सचिन मोरे व स्टाफ यांनी नेरुळ पोलीस ठाणे गुन्हा नोंद कं . २७६/२०२१ भादवि कलम ४२०,४०६ हा गुन्हा उघडकिस आणला आहे.

नमुद गुन्हयातील पाहिजे आरोपी यांनी फिर्यादी व इतर साक्षीदार यांची चार चाकी वाहने जास्तीचे भाडयाने मोठमोठया कंपनीत लावतो असे आमिष दाखवून त्यांचेकडून त्यांची चार चाकी वाहने घेवुन पहिल्या एक दोन महिन्याचे भाडे देवुन त्यांच्या मार्फतीने आणखी इतर लोकांचे वाहने भाडेतत्वावर घेवुन नमुद सर्व वाहने तिराहित व्यक्तीकडे गहाण ठेवून फसवणुक करून पळून गेले होते. नमुद आरोपीतांचा गुप्त बातमीदार व तांत्रिक माहिती आधारे अनेक दिवस पाळत ठेवून दिनांक २६/०७/२०२१ रोजी रात्रौ २२:०० वा. च्या सुमारास अधेरी मुंबई येथे साफळा रचुन १) छोटेलाल उर्फ राजेश शर्मा, वय – ५४ वर्षे रा. खारघर, ता. पनवेल, जि. रायगड, मुळगांव – जौनपुर, राज्य – उत्तर प्रदेश यास ताब्यात घेवून आरोपीताकडे तपास करून त्यांचा साथीदार नामे २) हरिदास शिलोत्रे उर्फ पाटील, वय – ४० वर्षे, रा. भिवंडी, जि. ठाणे, यास चेंबूर मुंबई येथून ताब्यात घेवून अटक करून दोन्ही आरोपीतांकडे कौशल्यपुर्ण तपास करून अटक आरोपीतांनी फिर्यादी यांचेकडुन भाडेतत्वावर घेतलेली वाहने तिराहित व्यक्तींकडे गहाण ठेवले असल्याचे आढळून आले नमुद एकुण ०२ कोटी १० लाख रूपये किमंतीचे एकुण – ३१ चार चाकी वाहने महाराष्ट्रातुन व परराज्यातुन जप्त करण्यात आलेली आहेत.

नमुद आरोपीतांकडुन खालील नमुद गुन्हे उघडकीस आणले आहेत.
१)नेरुळ पो.स्टे.गु.र.नं. २५६/२०२१ – भादवि ४२०,४०६, २)न्हावाशेवा पो.स्टे.गु.र.नं. ११५/२0२१ – भादवि ४०६, ३)मानखुर्द पो.स्टे गु.र.नं. १०२/२०२१ – भादवि ४२०,४०६, ४)खारघर पो.स्टे गु.र.नं. २७८/२०२१ – भादवि ४२०,४०६, ७)वाशी पो.स्टे गु.र.नं. २५०/२०२१ – भादवि ४०६,

उपरोक्त गुन्हयातील खालील नमुद मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.
१)नेरुळ पो.स्टे कडील एकुण – ०८ चार चाकी वाहने किमंत – ५६,००,०००/-, २)न्हावाशेवा पो.स्टे एकुण – ०१ चार चाकी वाहने किमंत २,५०,०००/-, ३) मानखुर्द पो.स्टे एकुण – ०१ चार चाकी वाहने किमंत ६,५०,०००/-, ४)खारघर पो.स्टे एकुण – ०४ चार चाकी वाहने किंमत २५,००,०००/-, ७)वाशी पो.स्टे एकुण – ०५ चार चाकी वाहने किंमत ३०,००,०००/-, ६)इतर साक्षीदार यांचे एकुण – १२ चार चाकी वाहने किंमत ९०,००,०००/-
एकुण ३१ वाहने जप्त मुद्देमाल किमंत – २,१०,००,०००/-

अशा प्रकारे आरोपीतांकडून उपरोक्त गुन्हयातील फसवणुक / अपहार केलेली १०० % मालमत्ता हस्तगत करून एकुण – ०५ फसवणुक / अपहाराचे गुन्हे उघडकीस आणुन दोन कोटी दहा लाख रूपयेची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे.

मा. पोलीस आयुक्त साो. श्री बिपीन कुमार सिंग, मा. सह पोलीस आयुक्त साो. डॉ. श्री. जय जाधव, मा. पोलीस उपआयुक्त श्री. सुरेश मेंगडे साो. परि – ०१ वाशी, मा. सहा पोलीस आयुक्त श्री. भरत गाडे साो, तुर्भे विभाग, यांनी नेरूळ पोलीस ठाण्याचे अभिनंदन केले असुन त्यांनी तपास पथकातील वपोनि शाम शिंदे, पो. नि. श्री. गवळी (गुन्हे) , सपोनि राजेंद्र घेवडेकर , सपोनि / सचिन मोरे, पो. हवा. / १०४० झांजे, पो.ना. / १७ बिरारी, पो.ना./२३२० पाटील, पो.शि./३१४८ सानप, पो.शि./१५२७ इंगळे, पो.शि/३२२५ आव्हाड या तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button