महाराष्ट्र

भारतीय मजदूर संघटनेच्या पोर्ट फेडरेशन राष्ट्रीय खजिनदारपदी कामगार नेते सुधीर घरत यांची निवड

उरण(दिनेश पवार) : भारतीय मजदूर संघाच्या भारतीय पोर्ट अँड डॉक मजदूर महासंघाच्या राष्ट्रीय खजिनदार या पदावर जेएनपीटीचे कामगार नेते सुधीर घरत यांची निवड झाली आहे. महासंघाची राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक नुकतीच संपन्न झाली त्यामध्ये फेडरेशनचे प्रभारी श्री. चंद्रकांत (अण्णा) धुमाळ व भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. जगदीश्वर राव यांनी ही निवड केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष ॲड. भवानीशंकराडू व जनरल सेक्रेटरी सुरेश पाटील व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

जे.एन.पी.टी बंदरात ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांना त्यांचे न्याय हक्क मिळावेत, किमान वेतन मिळावे याकरिता सातत्याने प्रयत्न करत त्यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात कामगार नेते सुधीर घरत यांनी प्रसंगी आक्रमक होत कामगारांना न्याय मिळवून दिला. माननीय रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांत दादा साहेब व आमदार महेश बालदी सल्लागार असणाऱ्या जेएनपीटी जनरल कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करताना एक संवेदनशील तेवढाच आक्रमक कामगार नेता अशी त्यांची ओळख आहे. अनेक तरुणांना नोकरी मिळवून देणे, उद्योग-धंद्यात उभे राहण्यासाठी सहकार्य करणे अशी त्यांची ओळख आहे.

भारतीय जनता पार्टीच्या ट्रान्सपोर्ट सेलच्या उत्तर रायगड जिल्ह्याची जबाबदारी ते पार पाडीत आहेत. त्यांच्या कामामुळे नव्याने त्यांच्यावर भारतीय म्हणजे मजदूर संघाच्या फेडरेशनच्या राष्ट्रीय खजिनदार पदाच्या निवडीने राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांनी त्यांचे सहकारी कामगार मित्र सुरेश पाटील व राष्ट्रीय प्रभारी श्री. चंद्रकांत (अण्णा) धुमाळ यांचे विशेष आभार मानले त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button