नवी मुंबई
VR4U फांऊडेशन कडून चिपळुण येथील पुरग्रस्तांकरिता छोटीशी मदत:
VR4U फांऊडेशन, नवी मुंबई कडून चिपळुण येथील पुरग्रस्तांकरिता छोटीशी मदत आज करण्यात आली. VR4U फांऊडेशन नेहमीच काही ना काही सामाजिक उपक्रम करत असते. चिपळूण येथील घडलेली दुर्दवी घटना ह्यासाठी प्रत्येकजण काही ना काही मानवतेच्या दृष्टिकोनातून मदत करतोय. VR4U फांऊडेशने पण आपले कर्तव्य म्हणून एक छोटीशी मदत केलेली आहे.
ह्यामध्ये १००० कि. गहुचे पीठ, ५०० कि. तांदुळ, २०० कि. साखर, २०० लि. खाद्य तेल, १०० किलो मिठ, २०० किलो तुरडाळ, चहा पावडर, मिरची पावडर, हळद, बिस्कीट / टोस्ट, १०० पाणी बॅाक्स, ३०० ट्रॅक सुट इत्यादी जीवनावश्यक गोष्टींचा समावेश होता.
यावेळी विजय पाटील, बाळासाहेब हाडोळे, बाळासाहेब कोल्हटकर, विवेक देसाई, चेतन महाडीक, मो. आसीफ, आनंद वैजनाथन, सुशांत आदींनी खूप मेहेनत घेतली.