नवी मुंबई
पूरग्रस्तांसाठी दोन टन जीवनावश्यक साहित्य
वाशी, प्रभाग क्रमांक ६४ मधील राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड ह्यांनी आपल्या वार्डमधील रहिवाशांच्या मदतीने कोकण विभागातील पूरग्रस्तांसाठी दोन टन जीवनावश्यक साहित्य जमा केले.
यामध्ये मिनरल वॉटर, बेडशीट्स, टॉवेल्स, पँट्स, साड्या, पेटीकोट्स, टी-शर्ट्स, बर्म्युडास, लेडीस अंडरगारमेंट्स, नाईट वेअर, सॅनिटरी पॅड, फिनाईल, डिटर्जंट पावडर, विम लिक्विड डिश वॉशर, विम बार, डेटॉल साबण, लिक्विड डेटॉल, हार्पिक लिक्विड, सॅनिटायझर्स, फेस मास्क, व्हॅसलीन क्रीम, हेअर ऑईल, स्टीमर, सॉफ्टहील लोशन, गहू पीठ, स्टील प्लेट्स, तांदूळ, साखर, स्वयंपाकाचे तेल, गॅस लाइटर इत्यादींचा समावेश आहे.
हे सर्व साहित्य आज रात्री सकाळ-ग्रुप कडे सुपूर्त करून उद्या सकाळी पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल जाईल.