उरण नगरपरिषद मार्फत पूरग्रस्तांसाठी मदत
उरण (दिनेश पवार) महाड तालुक्यात तुफान पाऊस पडला मुसळधार पावसामुळे सावित्री, गांधारी आणि काळ या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडत महाड शहरासह बिरवाडी औद्योगिक परिसरात प्रवेश केला. यामुळे पूरस्थिती निर्माण झाली परिणामी शहरातील बैठ्या घरांत आणि दुकानांमध्ये पाणी शिरले.
महाड मधील पूरग्रस्तांसाठी उरण नगरपरिषदने महाड पूरग्रस्त नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू देऊन मदतीचा हात दिला. शुक्रवार (दि. २३) रोजी उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, नगरसेवक कौशिक शाह, मुख्याधिकारी संतोष माळी, सविन म्हात्रे नगरसेवक राजेश ठाकूर, आणि सर्व नगरसेवक, नगरसेविका, उरण नगरपरिषदेतील सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, उरण शहरातील दानशूर व्यक्ती,आदींनी मदत केली.
ह्यामध्ये साड्या १००, टॉवेल ५०, मॅक्सी (गाऊन ) १००, परकर १००, टी शर्ट ५०, टॅक पॅन्ट १०, बेडशीट व चादर ३००, व इतर कपडे १०००, तांदुळ, बिस्कीट आदी जीवनावश्यक वस्तूंचा टेम्पो पाठविण्यात आला. सदर वस्तू उरण नगरपरिषद मध्ये जमा करून तेथून माणगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. तेथुन जिथे जरुरी आहे तिथे पाठविण्यात येणार आहे.