चला एक मदतीचा हात पुढे करूया आपल्या कोकणवासियांसाठी !
कोकणची माणसे साधी भोळी. दरवर्षी निसर्गाशी पावसाळ्यात दोन हात करत आपल्या जीवनात चेहऱ्यावर हास्य ठेवत कोकणवासिय वाटचाल करताना आपण जवळून पाहिला आहे, अनुभवला आहे. यंदाच्या पावसाळ्यात गेल्या काही दिवसापासून संततधार स्वरूपात मुसळधार पावसाने कोकणवासियांचे अतोनात नुकसान झाले आहे. जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. कोकणवासियांचे संसार आपणास पुन्हा उभे करायचे आहे. त्यांचे संसार पुन्हा फुलवायचे आहेत. एमआयएम विद्यार्थी आघाडीने कोकणवासियांना मदत करण्याचा संकल्प करत पुढाकार घेतला आहे. कोकण पुन्हा फुलवायची जबाबदारी आता महाराष्ट्राची आहे. महाराष्ट्राचे खरे निसर्ग सौंदर्य कोकणात आहे. महाराष्ट्राच्या भूमीवर काश्मिर कोठे असेल तर तो या कोकणातच आहे. चला तर मग, एक मदतीचा हात आता पुढे करूया आपल्या कोकणवासियांसाठी!
हा मदतीचा जगन्नाथाचा रथ हाकण्यासाठी सर्वाचेच योगदान हवे. चला तर या कामात संघठीत होवू या.
मदत आर्थिक स्वरूपात नाही तर जीवनावश्यक वस्तूंच्या स्वरूपात, धान्याच्या स्वरूपात केली जाणार आहे. तांदू, वेगवेगळ्या डाळी, तेलाची पाकिटे, खोबरेल तेल,मिठ, पोहे, वेगवेगळे मसाले, अंगाचे तसेच कपड्याचे साबण, फिनाईल बॉटल, चहा पावडर, दुध पावडर, गव्हाचे पिठ, पाणी बॉटल, टूथ ब्रश, टूथ पेस्ट, कपडे, टॉवेल, सॅनिटरी नॅपकिन यासह महिला, पुरूष, मुलांची कपडे आदी स्वरूपात मदत करण्यात येणार आहे.
ज्या कोणाला कोकणवासियांना मदत करायची असेल त्यांनी एमआयएम विद्यार्थी आघाडीचे प्रदेश महासचिव हाजी शाहनवाझ खान यांच्याशी ७७१००८६७८६ संपर्क साधावा, असे एमआयएमच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.