ऐरोली विभागातील अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई
अनधिकृत बांधकामे / अतिक्रमणे याविषयीच्या प्रतिबंधात्मक कारवाया नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात तीव्रतेने राबविण्यात येत असून आज नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जी विभाग ऐरोली अंतर्गत सेक्टर 09, ऐरोली येथील घर क्र. 440, दिवागांव तलावाशेजारी, जी + 1 इमारतीचे बांधकाम नवी मुंबई महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सुरु केले होते. या अनधिकृत बांधकामास ऐरोली विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 मधील कलम 54 अन्वये नोटीस बजाविण्यात आलेली होती. संबधितांनी केलेले अनधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी अनधिकृत बांधकाम सुरु ठेवेले होते.
या अनधिकृत बांधकामावर ऐरोली विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करण्यात येऊन सदर अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी 04 मजूर, 01 गॅसकटर, 02 इलेक्ट्रीक हॅमर जी विभाग ऐरोली येथील अधिकारी/कर्मचारी उपस्थित होते.
यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.