शिवसह्याद्री ऐक्यवर्धक संस्था आणि बौद्धजन विकास संस्थेतर्फे सीवूड्समध्ये होतकरू मुलांना वह्या वाटप, केंद्रीय मंत्री सन्मा. रामदासजी आठवले साहेब यांची लाभली उपस्थिती
दिनांक १० जुलै रोजी सकाळी ११. ०० वाजता, लुंबिनी बुद्ध विहार, सेक्टर 48, सिवूड्स येथे शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था, बौद्धजन विकास संस्था आणि बौद्धजन महिला विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले यांचा सन्मानचिन्ह देवून सत्कार करताना अध्यक्ष श्री सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष प्रा. वर्षा भोसले.
कोरोना काळात अनेक कुटुंबाचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. सध्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च हि अनेक पालकांना पेलवत नाही. अशा वेळी मुलांचे शिक्षण अविरत चालू राहावे आणि होतकरू मुलांना शिक्षणात थोडासा हातभार लावावा या हेतूने वह्यांचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले यांची उपस्थिती लाभली. सन्मा. रामदासजी आठवले यांनी आपल्या शैलीत चारोळी म्हणून संस्थेच्या कार्याचा गौरव केला. तसेच शिवसह्याद्री संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष प्रा. वर्षा भोसले, बौद्धजन विकास संस्थेचे अध्यक्ष राम झेंडे यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. शिवसह्याद्री संघटनेतर्फे सन्मा. रामदासजी आठवले यांचा सन्मानपत्र आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
शिवसह्याद्री संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. तसेच कार्यक्रम घेण्यामागचा मूळ हेतू स्पष्ट केला. कोरोनाच्या महामारीत आणि ऑनलाईन शिक्षणाच्या काळात मुलांचा लिहण्याचा सराव कमी झाल्याने, वहीवर लिहणे मुलांसाठी किती आवश्यक आहे हे प्रा. वर्षा भोसले यांनी पटवून दिले. तसेच दररोज विद्यार्थ्यांनी एका पानावर मराठीत आणि एका पानावर इंग्रजीत लिहून एका महिन्याने वही संस्थेच्या आदर्श मार्केट, सेक्टर-४८(अ) येथील कार्यालयात जमा करावी असे आवाहन केले. सर्वोत्कृष्ट ५ विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षीस देण्यात येईल, अशीही घोषणा केली. बौद्धजन विकास संस्थेचे अध्यक्ष राम झेंडे यांनी हा कार्यक्रम नाक्यावर काम करणाऱ्या, रोजंदारीवर काम करणाऱ्या पालकांच्या मुलांसाठी आयोजित केल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रत्नाकर कुदळे, डॉ. मिताताई गंगावणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन कदम, मनीषा भोसले – वाघ यांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमावेळी शिवसह्याद्री संस्थेचे अण्णासाहेब निकम, समीर बागवान, डॉ. प्रगती, रेखा वाघ, फुलन शिंदे, किसान मोरे, साहेबराव कदम, उमा इंगवले, अंनिता निकम आणि बौद्धजन विकास संस्थेचे बी. डी. बागुल, विजय हबळे, शैलेश जावळे, ज्योती भालेराव, सिंधू शिंदे, संध्या कांबळे, उज्वला हाबळे हे उपस्थित होते.
जाहिरात