उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचा “गौरव पत्रकारितेचा २०२१” कार्यक्रम संपन्न:
(उरण, प्रतिनिधी) : पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. जणसामान्यांच्या प्रश्नांना, समस्यांना न्याय देणाऱ्या घटकापैकी पत्रकार हा एक महत्त्वाचा घटक आहे. कोरोना काळात पत्रकारांनी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. त्यामुळे एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन या उरण मधील डॉक्टरांच्या संघटनेने उरण मधील सर्व पत्रकारांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला. व त्या दृष्टिकोनातून उरण येथील पत्रकारांचा शुक्रवार (दि. ९) रोजी ‘गौरव पत्रकारितेचा 2021’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याचे उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशन, उरणचे सचिव डॉ. सत्या ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांना शाल, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. पत्रकारांचा सन्मान करण्याच्या पाठीमागचा उद्देश संघटनेचे अध्यक्ष बालरोगतज्ज्ञ डॉ. विकास मोरे यांनी आपल्या प्रास्तविकातून व्यक्त केला. यावेळी मंत्रालय प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार प्रविण पुरो, प्रदीप पाटील, संजय गायकवाड आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. तर उरणचे दिवंगत जेष्ठ पत्रकार अतुल पाटील यांचा कोरोना मुळे दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच स्वर्गीय अतुल पाटील यांचे पुत्र आशिष पाटील व कन्या दीपिका पाटील यांचा सर्वप्रथम गौरव करण्यात आला.
उरण मधील ज्येष्ठ पत्रकार प्रविण पुरो, मधुकर ठाकूर, प्रदीप पाटील, संजय गायकवाड, दत्ता म्हात्रे, जीवन केणी, सूर्यकांत म्हात्रे, अजित पाटील, दिलीप कडू, सुभाष कडू, राजकुमार भगत, अनंत नारंगीकर, दिनेश पवार, महेश भोईर, पंकज ठाकूर, दीप्ती पाटील, विठ्ठल ममताबादे,सुयोग गायकवाड आदी पत्रकारांना यावेळी गुलाब पुष्प, शाल सन्मानचिन्ह देऊन ‘गौरव पत्रकारितेचा 2021’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजक उरण मेडिकल वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विकास मोरे, सचिव डॉ. सत्या ठाकरे, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयचे वैदकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे, डॉ मंगेश डाके, डॉ. घनश्याम पाटील आदींनी पत्रकारांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. सत्या ठाकरे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदक नितेश पंडित यांनी केले.
कार्यक्रमात मिलिंद पाडगावकर ,मच्छिमार्याचे नेते मार्तंड नाखवा, संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी आदी उपस्थित होते. त्यांचे हि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
जाहीरात