५ ते १२ जुलै पर्यंत लागू असलेले निर्बंध हे आता १२ ते १९ जुलै पर्यंत जसेच्या तसे लागू राहतील – आयुक्त अभिजीत बांगर
ज्याअर्थी, राज्य शासनाने उक्त संदर्भ क्र. 3 अन्वये पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी या प्रमाणावर आधारित विविध आर्थिक व सामाजिक ऍक्टिव्हिटीज विचारात घेऊन 05 स्तर (05 Levels) जाहीर केले आहेत. आणि
ज्याअर्थी, “Levels of Restrictions for Break The Chain” अंतर्गत राज्य शासनाने उक्त संदर्भ क्र. 3 अन्वये आदेश पारित केलेले आहेत. सदर आदेशास अनुसरुन नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उक्त संदर्भ क्र. 8 च्या आदेशान्वये नवी मुंबई क्षेत्रामध्ये पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेड ऑक्युपन्सी या प्रमाणावर आधारित विविध आर्थिक व सामाजिक ऍक्टिव्हिटीज विचारात घेता “Levels of Restrictions for SAFE MAHARASHTRA” अंतर्गत “निर्बंध स्तर- 3 (Restriction Level- 3)” नुसार दि. 5 जूलै, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते दि.12 जुलै 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत सुधारित निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत. आणि
ज्याअर्थी, उक्त संदर्भ क्र. 9 च्या आदेशानुसार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, ठाणे यांनी “Levels of Restrictions for SAFE MAHARASHTRA” अंतर्गत “निर्बंध स्तर- 3 (Restriction Level- 3)” मध्ये असल्याचे घोषित केले आहे.
त्याअर्थी, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉट क्षेत्रामधील COVID – 19 चा प्रादुर्भाव पाहता, साथरोग नियंत्रण अधिनियम, 1897 च्या कलम 2 अन्वये, तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 च्या सर्व संबंधित तरतूदींसह प्राप्त अधिकारांचा वापर करुन, मी अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महानगरपालिका, या आदेशान्वये नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये Levels of Restrictions for SAFE MAHARASHTRA अंतर्गत कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी खंडीत करण्याच्या दृष्टीकोणातून या कार्यालयाचे उक्त संदर्भान्वये “निबंध स्तर – 3 (Restriction Level – 3) प्रमाणे निर्गमित केलेले आदेश दि. 12 जुलै, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते दि. 19 जुलै, 2021 सकाळी 7.00 पर्यंत जसेच्या तसे लागू राहतील, असे जाहीर करीत आहे.
त्याचप्रमाणे, यापूर्वी वेळोवेळी काढण्यात आलेले सर्व आदेश या आदेशाशी संलग्न राहतील व सदर आदेश दिनांक 19 जुलै, 2021 रोजी सकाळी 7.00 वाजेपर्यंत लागू राहतील.
उक्त आदेशाचे उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती / संस्था यांचेवर साथरोग अधिनियम 1897, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51 ते 60 अन्वये तसेच, भारतीय दंड संहिता यामधील कलम 188 अन्वये कारवाई केली जाईल.
सदर आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी.
जाहिरात