जेष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांची सायफाय विज्ञानकथा ‘वारस’ ‘स्टोरीटेल’ द्वारे ऑडिओबुकमध्ये!
‘स्टोरीटेल मराठी’ सातत्याने विविध साहित्यप्रकारातील वेगवेगळ्या दर्जेदार तसेच गाजलेल्या लोकप्रिय कथा, कादंबऱ्यांसोबतच खास नव्या ओरिजनल ऑडिओबुक मालिकांची निर्मिती ऑडिओबुक माध्यमातून साहित्यरसिकांसाठी ‘स्टोरीटेल मराठी’ करीत आले आहे. मागील महिन्यात डॉ. जयंत नारळीकर लिखित ‘साहित्य अकादमी पुरस्कार विजेती ‘व्हायरस’ ही साहित्यकृती ‘स्टोरीटेल मराठी’च्या ‘ऑडिओबुक’मध्ये विज्ञानप्रेमी साहित्यरसिकांनी ऐकली होती. या विज्ञान ‘ऑडिओबुक’नंतर आता प्रख्यात जेष्ठ साहित्यिक निरंजन घाटे यांच्या ‘वारस’ या कादंबरीचे रूपांतर ‘स्टोरीटेल मराठी’च्या नव्या ‘ऑडिओबुक’मध्ये करण्यात आले असून अत्यंत वेगळा अनुभव पुन्हा ‘स्टोरीटेल मराठी’वर विज्ञानप्रेमी साहित्यरसिकांना घेता येणार आहे.
जेष्ठ साहित्यिक निरंजन घाटे लिखित “वारस” हि कथा आपल्याला विज्ञानाकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन देते. कथानक मनोरंजक असलं तरी त्याच्या अंतरंगात मानवी अस्तित्वाला पडलेले प्रश्न आपल्याला ठळक दिसतात. या कथेतील नचिकेतला एक मोहीम सोपवली जाते आणि ती फत्ते करण्यासाठी पृथ्वीवर जावे लागते. पण हे सगळं करत असताना त्याला त्याच्याच अस्तित्वाचा शोध लागतो का? खरा वारस नेमका कोण असतो? या अशा अनेक प्रसंगाचा थरारक अनुभव दर्शवणारी, निरंजन घाटे लिखित मराठी कादंबरी, अभिनेते – दिग्दर्शक गणेश माने यांच्या आवाजात साहित्यरसिकांना आता स्टोरीटेल मराठीच्या ऑडिओबुक ऐकता येईल.
जेष्ठ साहित्यिक निरंजन घाटे हे मराठी विज्ञान साहित्यामधील एक अग्रगण्य लेखक आहेत. घाटेंनी इ. स. १९७० – ७२ च्या दरम्यान विज्ञान कथा लेखनास प्रारंभ केला. तेव्हापासून आतापर्यंत ते लिहीतच आहेत. विज्ञान साहित्याच्या प्रांतात त्यांचे भरपूर लेखन आहे. त्यांनी विज्ञानकथा ह्या प्रकारासोबतच विज्ञान कादंबरी, लोकार्थी विज्ञान ह्या प्रकारांमध्येही विपुल लेखन केलेले आहे. त्यांनी अनेक नियतकालिकांमध्ये लेखनासोबतच काही नियतकालिकांचे संपादकही भूषविले आहे. ते विज्ञानकथा ह्या वाङ्मयप्रकाराचे चांगले अभ्यासकही आहेत. त्यांनी अनेक पाश्चात्य कथाकारांच्या कथा भाषांतरित केल्या आहेत. असा त्यांचा विज्ञानकथालेखनाचा अनुभव अतिशय समृद्ध आहे. त्यांच्या विज्ञानकथा ह्या अतिशय उद्बोधक असून त्यांच्या कथा थेट साहित्यरसिकांना भिडतात.
‘वारस’ ही सायफाय विज्ञानकथा ऐकण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठी पुस्तके ‘सिलेक्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.
जाहिरात