विविध संस्थामार्फत वन महोत्सव साजरा
कोरोना काळात अनेक रुग्णांना ऑक्सिजन पुरवण्यासाठी काही वेळा आरोग्यसेवेवर ताण आला मग विचार करा संपुर्ण जगाला ऑक्सिजन पुरविण्याची सुविधा निसर्ग कशा प्रकारे करित असेल. निसर्गाचे उपकार फेडण्यासाठी आपल्या वसुंधरेला वाचवण्यासाठी आज प्रत्येकाने एक एक झाड लावुन पर्यावरण संवर्धनाचे कार्य केले पाहिजे.
झाडे लावणे आणि वनांचे संरक्षण करणे ही एक निसर्गसेवेतून केलेली ईश्वर सेवाच आहे.
ह्याच उद्देशाने वन महोत्सव सप्ताहाचे औचित्य साधुन नेहरु युवा केंद्र, अलिबाग (भारत सरकार) यांच्या मार्फत आयोजित केलेल्या चिर्ले येथील दुधेला डोंगर परिसरात वृक्षारोपन आणि बीजगोळे रोपन करुन वन महोत्सव संपन्न झाला. या अभियानात महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे, स्व. संगिता मच्छिंद्र ठाकूर फांऊडेशन धुतूम, वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था आणि वटवृक्ष सामाजिक संस्था उलवे अशा चार संस्थानी सहभाग घेवुन वड, उंबर, पिंपळ, जांभुळ, साग, कडुलिंब, बेल, करंज ईत्यादी झाडे लावुन विविध बियांचे शेकडो बीजगोळे तयार करुन तिथेच त्यांचे रोपन केले. याप्रसंगी रायगड भुषण मनोज पाटील, किरण मढवी, आनंद मढवी, वनविभागाचे डी.डी.पाटील, मेजर किरण देवकाते, मेजर सुदाम धांडे,माया भोसले, महेश भोईर, विवेक केणी, काशिनाथ खारपाटील, अक्षय पाटील, चैतन्य मढवी, करण पाटील, दिलीप मढवी, पंकज घरत, तसेच संस्थाचे पदाधिकारी वृक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते
जाहिरात