आगीत घर भस्मसात झालेल्या कुटुंबाला केळवणेच्या तरूणांनी दिला मदतीचा हात केळवणे गावाने दाखवीले माणूसकीच दर्शन
उरण (दिनेश पवार): उरण तालुक्यातील केळवणे येथे गेल्या आठवड्यात २५ जुन गुरूवारी रात्री १२ वाजता हरिभाऊ शंकर ठाकुर यांच्या घराला अचानक आग लागली होती. त्या आगीमध्ये त्यांचे घर पूर्ण बेचिराख झाले. परंतू गावातील नागरीकांनी शासकीय मदतीची वाट न पाहता आपापल्या परीने पैसे गोळा करुन त्यांना जवळपास 69 हजार रुपयांची भरीव मदत करुन माणूसकीच दर्शन घडवल. त्यामूळे केळवणे गावच्या या आदर्श कृतीची सगळीकडे कौतूक होत आहे.
हरिभाऊ मच्छिमार बोटीवर काम करत असल्यामुळे ते घरात नव्हते. त्यांच्या पत्नीचेही ३ वर्षापूर्वी निधन झाल्याने त्यांच्या दोन्ही मुली रात्री भीती वाटते म्हणून मामाच्या घरी झोपायला गेल्या होत्या. त्यामुळे घरात कुणीही नव्हते. घराला आग लागल्याचे शेजाऱ्यांना माहीत होताच त्यांनी आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी आवाज दिला. त्यावेळी गावातील तरूण वर्गांनी पाणी कमेटीच्या साहाय्याने पाणी चालू करून दोन मोटर लावून आग आटोक्यात आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु तो पर्यत हरिभाऊ यांचे घर पूर्णतः जळून खाक झाले होते. या आगीत त्यांच्या घरातील कपडे, भांडी, धान्य, सामान यांचा लवलेशही उरला नाही, त्यांचा संसार अगदी रस्त्यावर आल्यामुळे त्यांनी अशावेळी शासनाकडे काहीतरी मदत व्हावी म्हणून याचना केली आहे.
शासकीय मदत होईल तेव्हा होईल याची वाट न बघता गावातील जुनी आळीतील काही युवा वर्ग ग्रामपंचायत सदस्य सुशिल हिराजी ठाकूर, संदीप भोईर (गुरुजी), भगवान पाटील, डी के पाटील, रामचंद्र म्हात्रे, प्रदीप पाटील राजन पाटील, विश्वजित पाटील, प्रणय पाटील व इतर एकत्र येऊन सर्वांनी मिळून ३४,१०० धनादेश जमा करून पिडित कुटुंबाला एक हात मदतीचा म्हणून जमा केला. तसेच गावातील काही लोकांनी एक हात मदतीचा म्हणून वाट्सअप गृप बनवून २० हजार सचिन ठाकुर यांच्या हस्ते देऊ केले असे समजते. त्याचप्रमाणे आमदार महेश बालदी यांच्या कडून १५ हजाराची मदत केळवणे पंचायत समिती युवा मोर्चा अध्यक्ष सुशिल ठाकूर व त्यांच्या सहकार्यांनी मिळवून दिले.
अशा बिकट प्रसंगी मदतीसाठी धावून आलेल्या सर्व लोकांचे हरिभाऊ शंकर ठाकुर यांनी आभार मानले
जाहिरात