क्राइम

ज्वालाग्रही पदार्थ वापरून स्फोट घडवून आणणा-या आरोपींना शिताफीने अटक

दिनांक ०३/०७/२०२१ रोजी रात्री ०२-३० वा. चे सुमारास एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत बहुउददेशीय बिल्डींग ‘जे’ विंग समोर, फळ मार्केट सेक्टर नं. १९, एपीएमसी या ठिकाणी फळांचे रिकामे कॅरेट भरलेला आयशर टॅम्पो नं. एम एच ४३ / ए डी ७५९८ हा पार्क केलेला असताना त्यास अचानक आग लागली व स्फोट झालेबाबत माहिती एपीएमसी पोलीस ठाणेस मिळाली. तातडीने पोलीस पथक सदर ठिकाणी हजर झाले व फायर ब्रिगेडचे मदतीने लागलेली आग विझवली. सदर प्रकरणी श्री. राजीवकुमार यादव यांचे खबरे वरून अकस्मात जळीत नोंद क्रमांक ०७/२०२१ अन्वये प्रकरण नोंद करून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली

या प्रकरणी विशेष पथक नेमुन चौकशी सुरु असताना अधीक चौकशी केली असता श्री. राजकुमार यादव यांनी माहिती दिली की, त्याची वरील गाडी ही त्याने श्री. अब्बास सत्तार खान याच्याकडुन विकत घेतली होती. व गेले काही महिन्यापासुन त्याच्याबरोबर गाडीच्या खरेदीबाबत तसेच धंदयाबाबत भांडण सुरू होते. त्याचा मुलगा नामे सोहेल याने राजकुमार यास अनेक वेळा धमकी दिली होती. सदर ठिकाणाचे सुक्ष्म परीक्षण, साक्षीदाराकडे केलेली चौकशी व याबाबत घेतलेली माहिती यावरून सदरचा प्रकार हा घातपाताचा असल्याचे प्राथमिक दृष्टया निष्पन्न झाले. सबब सदर प्रकरणी श्री. राजीवकुमार यादव यांचे तक्रारी वरून दिनांक ०५/०७/२०२१ रोजी एपीएमसी पोलीस ठाणेत गुन्हा नोंद क्रमांक २४०/२०२१ , भादवी कलम ४३५, ३४ अन्वये नोंद करण्यात आला आहे. गुन्हयाच्या तपासामध्ये तातडीने कारवाई सुरूवात केली.

नमुद गुन्हयातील आरोपी अब्बास सत्तार खान व सोहेल अब्बास खान यांची गुप्त बातमीदारांचे मार्फतीने माहिती घेवून आरोपी नामे १)आब्बास सत्तार खान यास शिताफीने ताब्यात घेवून तपास केला असता त्याने गुन्हयाची कबुली दिली व सदरचे कृत्याबाबत अधिक माहिती दिली. तसेच नमुद गुन्हयातील कटाचा मुख्य सुत्रधार पाहिजे आरोपी २)सोहेल अब्बास खान याचे बाबत पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी माहिती घेतली असता तो दिनांक ०३/०७/२०२१ रोजी झालेले स्फोटात भाजुन जखमी झाल्याने दवा-उपचारा करीता कोपरखैरणे येथील एका हॉस्पिटलमध्ये दाखल असुन, नमुद आरोपीस हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यास नमुद गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेण्यात येत आहे.

गुन्हयातील अटक आरोपी व पाहिजे आरोपींकडे झाले तपासात नमुद गुन्हयात आणखी इतर तीन आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने पाहिजे आरोपींचा तांत्रीक व गुप्त बातमीदाराचे मार्फतीने तपास करुन आरोपीत इसम नामे ३)आफताब युसुफ खान, वय २० वर्षे ४)निजामुद्दीन इकबाल खान, वय २० वर्षे ५)तौसीफ अब्दुलहमीद शेख, वय २० वर्षे, यांना शिताफीने ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास केला. त्यांचा वरील गुन्हयात सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांना नमुद गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे. सदर गुन्हयाच्या तपासात निष्पन्न झालेल्या बाबींवरून वरील गुन्हयांच्या कलमात भा.द.वी कलम १२० (ब), १४१, १४३, १४९, सह स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३ (क) अशी वाढ करण्यात आलेली आहे. आरोपींची पोलीस कोठडी दि. ९/७/२०२१ पर्यंत मा. न्यायालयाने मंजुर केली आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीन कुमार सिंह सो, मा. पोलीस सह आयुक्त डॉ. जय जाधव सो, मा. पोलीस उप आयुक्त परि – १ श्री. सुरेश मेंगडे, सहा. पोलीस आयुक्त श्री. विनायक वस्त सो, यांचे मार्गदर्शनाखाली मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विकास रामुगडे, मा. पोलीस निरीक्षक बी.एस. सय्यद, सहा. पोलीस निरीक्षक कडाळे, पोउपनिरी आव्हाड, पोउपनिरी कुंभार व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली आहे.

जाहिरात

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button