लस घेताय, जरा जपून…
कोरोना प्रतिबंधक लसिकरण कॅम्प लावुन फसवणुक केलेले इसम डॉ. मनिष त्रिपाठी व इतर यांचे विरुध्द गुन्हा दाखल झाले बाबत:
फिर्यादी नामे कल्पेश पद्माकर पाटील वय २९ वर्ष हे नोकरीस असलेली ॲटोम्बर्ग टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेड कंपनी, प्लॉट नं. डी १३०, टीटीसी इन्डस्ट्रीएल एरिया, शिरवणे एमआयडीसी, नेरुळ, नवी मुंबई, यांनी दिनांक २३/०४/२०२१ रोजी कोरोना या साथीच्या आजाराच्या पार्श्वभुमीवर लसीकरण कॅम्प आयोजित करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे कंपनी मालक शिबब्रता दास यांचे ओळखीचे मित्र किरण सुरवाडे यांचे मध्यस्थीने डॉ. मनिष त्रिपाठी केसीईपी हेल्थ केअर, दुसरा मजला, किस्टन लॉन, शिवम् सुंदरम हॉटेल समोर, ठाकुर कॉम्पलेक्स, कांदीवली ईस्ट, मुंबई यांचे टिमचे नाव सुचविले. सदर लसिकरण कॅम्पचे आयोजक डॉ. मनिष त्रिपाठी व करिम व एक अनोळखी इसम होते. लसिकरण कॅम्पवेळी कोविशिल्ड लस देण्याचे ठरले होते. प्रत्येक वॅक्सीन रुपये १२३० प्रमाणे खर्च ठरला होता. तसेच प्रवास खर्च वेगळा आकारला जाईल असे देखील ठरले होते. त्याप्रमाणे दिनांक २३/०४/२०२१ रोजी सायंकाळी १८:०० ते रात्री २१:00 वाजता दरम्यान ॲटोम्बर्ग टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेड कंपनीच्या एकुण ३५२ कर्मचा-यांनी उपस्थित राहुन लस घेतली आहे. लसिकरण कॅम्प संपले नंतर आरोपी डॉ. मनिष त्रिपाठी यांनी व्हाट्सअपद्वारे बिल पाठविले जाईल व लसिकरण नोंदणी प्रमाणपत्र दोन दिवसात कोविन अप्स् मधुन मेसेजद्वारे पाठविले जाईल असे सांगितले होते. आरोपी डॉ. मनिष त्रिपाठी यांनी दुस-या दिवसी दिनांक २४/०४/२०२१ रोजी व्हाट्सअप वरुन केईसीपी हेल्थ केअर या हॉस्पीटलचे पुर्ण लसिकरणाचे एकुण ४,३३,२००/- रुपये व प्रवास खर्चाचे एकुण ८,७०० रुपये, अशी दोन बिले प्राप्त झाली. त्याप्रमाणे फिर्यादीच्या कंपनीने एकुण रुपये ४,२४,५३६/- ऑनलाईन पध्दतीने डॉ. मनिष त्रिपाठी यांना दिले आहे.
दिनांक २५/०४/२०२१ रोजी पर्यत कंपनीच्या कोणत्याही कामगारांना प्रत्यक्ष किंवा मेसेजद्वारे लसिकरण नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले नाही. म्हणुन कंपनी प्रशासनाकडुन डॉ. मनिष त्रिपाठी यांचेकडे पाठपुरावा केला असता त्यांने तांत्रिक अडचणी / घरगुती कारणे देउन उडवा-उडवीची उत्तरे दिली.
त्यानंतर ॲटोम्बर्ग टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेड कंपनीच्या दिनांक ०९ / ०६ / २०२१ रोजी कंपनीतील दोन कामगारांना वॅक्सीन घेतलेबाबत प्रमाणपत्राचे संदेश कोविन यॅप मधुन मिळाले . त्यामध्ये नानावटी रुग्णालय मुंबई यांचे प्रमाणपत्र होते. व दिनांक ०९ / ०६ / २०२१ अशी वॅक्सीन घेतलेल्या तारखेबाबत विरोधा भास होता. तसेच इतर कामगारांना आजपर्यंत प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्यानंतर ॲटोम्बर्ग टेक्नोलॉजी प्रा. लिमिटेड कंपनी व कामगरांची खात्री झाली कि त्यांची फसवणुक झाली आहे. फिर्यादी यांचे कंपनीने दिलेल्या तकारी अर्जा वरुन दिनांक ०२/०७/२०२१ रोजी तुर्भे पोलीस ठाणे गुन्हा रजि क्रमांक २०४/२०२१ भा.द.वि. कलम १८८, २६८, २७०, २७४, २७५, २७६,३४, ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७०, माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कलम ६६ सी, डी साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी १) मनिष त्रिपाठी, २) करीम, ३) अनोळखी इसम यांनी लसिकरण कॅम्प आयोजीत करुन संगणमताने कंपनीतील कामगारांना कोविशिल्ड लस देण्याकरीता लसिकरण ठिकाणी प्रशिक्षित डॉक्टर उपस्थितीत ठेवले नाहीत. तसेच वॅक्सीन बॉटलमध्ये काहीतरी लससदृक्ष द्रव्य आणुन जाणिवपुर्वक कंपनीतील कामगारांच्या जिवितांस धोका निर्माण केले तसेच तेथे प्रक्षिशित डॉक्टर्स असल्याचे भासविले. व दोन कामगारांना लसिकरण घेतलेल्या तारीख व ठिकाण बदलुन ऑनलाईन माहीती भरुन प्रमाणपत्र दिले व खरे असल्याचे भासविले आहे. व इतर ३५० कामगरांची लसिकरण नोंदणी केली नाही. तसेच एकुण ४,२४,५३६ रुपये ऑनलाईन पध्दतीने घेउन फसवणुक केली आहे.
गुन्हयातील आरोपी डॉ. मनिष त्रिपाठी व इतर यांचे विरुध्द मुंबई शहर एकुण ७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यापैकी कांदीवली पोलीस ठाणे गुन्हा रजि क्रमांक ५ ९१ / २०२१ भा.द.वि. कलम १८८, २६८, २७०, २७४, २७५, २७६,३४ , ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७०, माहीती तंत्रज्ञान अधिनियम २००८ कलम ४३, ६६ सी, साथीचे रोग अधिनियम १८९७ कलम ३ प्रमाणे गुन्हा नोद असुन सदर गुन्हयात आरोपी डॉ. मनिष त्रिपाठी व करीम या इसमांस अटक केली असुन ते पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहेत. सदर आरोपींची पुर्ण माहीती घेउन सदर गुन्हयात लवकरात लवकर ताबा घेउन अटक करण्यात येणार आहे.
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस आयुक्त सो., मा. पोलीस सह आयुक्त सो. नवी मुंबई, व मा. पोलीस उप आयुक्त सो. परीमंडळ – १ वाशी, नवी मुंबई यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र आव्हाड (तुर्भे पोलीस ठाणे) करीत आहेत.