मोक्का मधून सुटलेला व अल्पवयीन मुलीवरील बलात्कारच्या गुन्ह्यामधील पाहिजे आरोपीस अग्निशस्त्रासह पनवेल गुन्हे शाखे कडून अटक
मा. पोलीस आयुक्त बी.के.सिंग, मा. अपर पोलीस आंयुक्त (गुन्हे) डॉ. बी.जी.शेखर पाटील, मा.पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनीं “अवैध अग्णिशस्त्र विरोधी मोहीम” (ILLEGAL FIRE ARMS DRIVE) पंधरवडा राबवणेबाबत आदेशीत केले होते. त्याअनुशंगाने गुन्हे शाखा कक्ष-02, नवी मुंबईचे पो.उप.निरी. वैभव रोंगे यांना मिळालेल्या माहीतीनुसार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अभिलेखावरील मोक्का केसमधुन नुकताच सुटलेला, गोळीबार, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी, चोरी, पोलीसांवर हल्ले करणारा सराईत गुन्हेगार व ठाणे आयुक्तालयाच्या अभिलेखावर बलात्कार, पोक्सोच्या गुन्ह्यामध्ये पाहीजे असलेला आरोपी प्रतिक मनोहर शिवपुज हा तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे जवळ, अग्णिशस्त्रासह शेवरलेट कारमधुन येणार असल्याची खात्रिशीर माहीती मिळाल्याने सदरबाबत मा. सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे)विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-02 चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक गिरिधर गोरे यांच्या नेतृत्वखाली स पो नि गणेश कराड, प्रवीण पाटील, पो उप नि वैभव रोंगे, मानसिंग पाटील, पो.ह.अनिल पाटील, गडदे, सुनील कुदले दिपक डोंगर, सचिन म्हात्रे, रुपेश पाटील, काटकर साळुंखे भोपी, सुर्य्वंशी हे अधिकारी कर्मचारी यांची पथके बनवुन तळोजा कारागृहाच्या जवळ सापळा लावुन थांबले असता, सदर बातमीमधील कार येवुन थांबली कारमधील इसमास पोलीसांची चाहुल लागल्याने ते पळुन जाण्याच्या तयारीत असताना, सदर कारला पोलीस पथकाचे ताब्यातील एक कार आडवी लावुन थांबवण्याचा प्रयत्न केला, सदर कार चालकाने त्याचे ताब्यातील कार फुटपाथवर चढवल्याने सदर कारच्या टायरचा फूटून ती थांबली. त्यानंतर लगेच चारही बाजुनी सदर कारला घेराव घालुन कारमधील इसम नामे प्रतिक मनोहर शिवपुजे, वय 27 वर्षे, रा. गणपत म्हात्रे बिल्डींग, रुम नं. 401 चौथा माळा, शिवाजी तलाव पाळी रोड, घनसोली गाव, नवी मुंबई व त्याचेसोबत लक्ष्मण माणिक राठोड वय 21 वर्षे, ऱा. न्यु गोल्डन नगर झोपडपट्टी, नौसील नाका, रुम नं. 249, घनसोली, नवी मुंबई यास ताब्यात घेतले असता प्रतिक शिवपुजे याचेकडे एक देशीं बनावटीचे पिस्टल व दोन जिवन्त काडतूस मिळुन आले व लक्ष्मण राठोड याचे खिशामध्ये दोन जिवंत काडतुस मिळुन आल्याने त्यांचेविरुद्ध खारघर पोलीस ठाणे, नवी मुंबई गु.रजी क्र.235/2021 भारतिय शस्त्र अधिनीयम कायदा कलम 3,25 अन्वये गुन्हा नोंद करुन सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
आरोपी प्रतिक मनोहर शिवपुजे हा कापुरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे गु.रजी. क्र. 290/2020 भा.दं.वि. कलम 363,376,34 सह पोक्सो कायदा कलम 4,8,12 या गुन्ह्यामध्ये पाहीजे आरोपी आहे.
आरोपी प्रतिक मनोहर शिवपुजे याचा गुन्हे अभिलेखः-
1. कोपरखैरणे पोलीस ठाणे, नवी मुंबई 398/2012 भा.दं.वि. कलम 385,386,364अ,395,342 सह मोक्का कायदा.
2. ए.पी.एम.सी. पोलीस ठाणे नवी मुंबई 131/2011 भा.दं.वि. कलम 307,34 शस्त्र अधिनियम कलम 3,25. ( व्यापारी सुनिल भोईटे यांच्यावरील गोळीबार प्रकरण)
3. वाशी पोलीस ठाणे, नवी मुंबई. गु.रजी. क्र. 146/2013 भा.दं.वि. कलम 353,332,186,506.
4. रबाळे पोलीस ठाणे, नवी मुंबई, गु.रजी.क्र. 349/2006 भा.दं.वि. कलम 379,411,34.
5. कोपरखैरणे पोलीस ठाणे, नवि मुंबई गु.रजी.क्र.304/2010 भा.दं.वि. कलम 324,323,504,34
6. मुलंड पोलीस ठाणे, मुंबई गु.रजी.क्र. 546/2006 भा.दं.वि. कलम 379,34.
7. मुलुंड पोलीस ठाणे, मुंबई, गु.रजी. क्र 1198/2007 भा.दं.वि. कलम 324.
8. ठाणेनगर पोलीस ठाणे, गु.रजी. क्र. 1362/2007 भा.दं.वि. कलम 324.
9. रबाळे पोलीस ठाणे, नवी मुंबई गु.रजी. क्र. 453/2021 भा.दं.वि. कलम 380,411,34.
10. रबाळे पोलीस ठाणे, नवी मुंबई गु.रजी. क्र. 394/2007 भा.दं.वि. कलम 379,34.
11. कोपरखैरणे पो. ठाणे, नवी मुंबई. गु.रजी.क्र. 101/2011 भा.दं.वि. कलम 379.
# आरोपी लक्ष्मण माणिक राठोड याचा गुन्हे अभिलेख.
1. रबाळे पोलीस ठाणे, नवी मुंबई 290/2017 भा.दं.वि. कलम 325,323,504,506,34.
2. रबाळे एम.आय.सी. पोलीस ठाणे गु.रजी. क्र. 1166/2016 भा.दं.वि. कलम 397,395.
3. रबाळे एम.आय.डी.सी. पो. ठाणे, गु.रजी. क्र. 166/2016 शस्त्र अधिनियम कलम 4,25.
पुढिल तपास गुन्हे शाखा कक्ष 02करित आहेत