उरण येथे आधारकार्ड केंद्र सुरु
उरण (दिनेश पवार): आधारकार्ड चे मह्त्व वाढले असून प्रत्येक ठिकाणी आधार कार्ड विचारले जाते .कोणतेही शासकीय, खाजगी कामासाठी आधार कार्डची जरुरी भासत आहे. उरण शहरातील नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी जासई, नवघर, चिरनेर, कोप्रोली, जेएनपीटी आदी ठिकाणी जावे लागत असे त्यातच नागरिकांना जाण्या -येण्यासाठी पैसे लागत असे त्याचप्रंमाणे वेळेचा अपव्यय होत असे हि समस्या लक्षात घेऊन आमदार महेश बालदी यांच्या सहकार्याने व उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांच्या पुढाकाराने मंगळवार (दि. २९) रोजी उरण येथील नगरपरिषद शाळा महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. नारायण विष्णू धर्माधिकारी शाळा क्र.१ शाळेच्या वर, पेन्शनर पार्क समोर उरण येथे आधार कार्ड केंद्र सुरु करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु आहे. शनिवार व रविवार बंद, दररोज ३० आधारकार्ड काढले जातात असे सांगण्यात आले आहे.
या वेळी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, उरण तालुका भाजपाध्यक्ष नगरसेवक रवी भोईर, उरण शहर अध्यक्ष तथा, नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेविका जानव्ही पंडीत, नगरसेविका दमयंती म्हात्रे, भाजपा उरण शहर महिला अध्यक्ष संपूर्णा थळी, कॉम्पुटर ऑपरेटर आरती पाटील, सिमा इंगळे आदी उपस्थित होते.
पांच वर्षा खालील मुलांचे आधार कार्ड काढावयाचे असल्यास मुलाचा जन्माचा दाखला, वडील किंवा आईचे आधार कार्ड आवश्यक आहे. नवीन कार्ड बनविणे, नाव बदलणे, पत्ता बदलणे व कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करावयाची असेल तर करून मिळेल.
उरण नगरपरिषद हददीतील नागरिकांना आधार कार्ड काढणे, लहान मुलांचे आधार कार्ड काढणे, वृद्धांचे आधारकार्ड काढणे, महिलांचे आधार कार्ड काढणे त्यासाठी उरण शहरापासून बाहेर जाऊन काढावे लागत असे हि समस्या लक्षात घेऊन उरण नगरपरिषदच्या वतीने आधार कार्ड केंद्र सुरु करण्यात आले आहे तरी त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा व नगरपरिषदेला सहकार्य करावे – सायली म्हात्रे नगराध्यक्षा – उरण नगरपरिषद
.