बेलापूर विभागातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई
नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील बेलापूर विभाग अंतर्गत १) बेलापूर गांव, सेक्टर-२० लक्ष्मण तुकाराम भोईर व २) बेलापूर गांव, सेक्टर-२० येथील श्री. सत्यवान सावळाराम म्हात्रे, यांनी बांधकाम नवी मुंबई महानगपालिकेची कोणतेही पुर्वपरवानगी न घेता अनाधिकृतपणे बांधकाम सुरु केले होते. अनाधिकृत बांधकामास बेलापूर विभागामार्फत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ मधील कलम ५४ अन्वये नोटीस बजावण्यात आलेली होती. संबंधीताने केलेले अनाधिकृत बांधकाम स्वत:हून हटविणे आवश्यक होते. परंतु त्यांनी सदर ठिकाणी अनाधिकृत बांधकाम सुरु ठेवले आहे.
सदर अनाधिकृत बांधकामावर बेलापूर विभागामार्फत तोडक मोहिमेचे आयोजन करुन करण्यात आलेले अनाधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले. या धडक मोहिमेसाठी बेलापूर विभागाकडील अधिकारी / कर्मचारी १८ मजुर २ गॅसकटर २ इलेक्ट्रीकल हॅमर तसेचअतिक्रमण विभागाकडील पोलिस तैनात होते.
या पुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.