नवी मुंबई

“निर्बंध स्तर-3” नुसार दिनांक 28 जून, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते दिनांक 05 जुलै 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत लागू असलेले निर्बंध:

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये Levels of Restrictions for SAFE MAHARASHTRA अंतर्गत “निर्बंध स्तर-3 (Restriction Levels-3)” नुसार दि. 28 जून, 2021 रोजी सकाळी 7.00 पासून ते दि. 05 जुलै 2021 रोजी सकाळी 7.00 पर्यंत खालील निर्बंध लागू राहतील.

1. सर्व अत्यावश्यक सेवांची दुकाने सायंकाळी 4.00 वा. पर्यंत सुरु राहतील.
2. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार सदर आस्थापना पूर्णपणे बंद राहतील.
3. मॉल्स / सिनेमागृहे (मल्टीप्लेक्ससह सिंगल स्क्रिन) / नाट्यगृहे इ. पूर्णपणे बंद राहतील.
4. रेस्टोरंट्स सोमवार ते शुक्रवार एकूण आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सायंकाळी 4.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र, सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4.00 वा. नंतर तसेच शनिवार आणि रविवार फक्त टेक अवे / पार्सल सर्व्हिस आणि होम डिलेव्हरी सेवा सुरु राहील.
5. सार्वजनिक ठिकाणे / खुली मैदाने / वॉकिंग / सायकलिंग दररोज सकाळी 5.00 वा. पासून सकाळी 9.00 वा. पर्यंत सुरु राहतील. मात्र सकाळी 9.00 नंतर सदर बाबीस प्रतिबंध राहील.
6. खाजगी कार्यालये कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सायं. 4.00 वाजेपर्यंत (सूट देण्यात आलेली कार्यालये वगळून) सुरु राहतील.
7. कार्यालयीन उपस्थिती – शासकीय कार्यालयासह परवानगी असणारी खाजगी कार्यालये 50% समतेने सुरु राहतील.
8. क्रीडा – सकाळी 5.00 वा. पासून सकाळी 9.00 वा. पर्यंत फक्त मैदानी खेळांना परवानगी राहील.
9. चित्रीकरण Bubble झोनच्या क्षेत्रात सुरू राहील. सायं. 5.00 नंतर हालचालीस प्रतिबंध राहील.
10. सामाजिक / सांस्कृतिक / मनोरंजनपर कार्यक्रम 50% आसन क्षमतेने सोमवार ते शुक्रवार सायं 4.00 वा. पर्यंत करता येतील.
11. लग्न समारंभ केवळ 50 लोकांच्या मर्यादेतच करता येईल.
12 अंत्यसंस्कार विधी केवळ 20 लोकांच्या मर्यादेतच करता येईल.
13. बांधकामाकरीता केवळ साईटवर मजुर राहणाऱ्या ठिकाणी अथवा सायंकाळी 4.00 वा. पर्यंत कामगारांनी कामाचे ठिकाण सोडले पाहिजे या अटीवर परवानगी राहील.
14. कृषि विषयक सेवा दुकाने परवानगी दिलेल्या वेळेत सुरु राहतील.
15. ई – कॉमर्स – साहित्य व सेवा नियमित सुरु राहतील.
16. जमावबंदी सायं. 5.00 वा. पर्यंत व संचारबंदी सायं. 5.00 वा. नंतर लागू राहील.
17. व्यायामशाळा / केश कर्तनालय / ब्युटी सेंटर्स / स्पा / वेलनेस सेंटर्स सायं. 4.00 पर्यंत एकुण क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु ठेवणेस परवानगी राहील. परंतु, ग्राहकांना पूर्वनियोजित वेळ घेऊनच (Prior Appointment Basis) यावे लागेल. वातानुकूलन यंत्रणेचा वापर करता येणार नाही.
18. सार्वजनिक परिवहन सेवा 100% बैठक क्षमतेने सुरु राहतील. परंतू, प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही.
19. मालवाहतूक जास्तीत जास्त 3 व्यक्तीसह ( वाहन चालक / हेल्पर / क्लिनर इ.) लागू असलेल्या सर्व नियमांसह नियमितपणे सुरू राहील.
20. खाजगी कार / टॅक्सी / बस लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवासासाठी (आंतर जिल्हा प्रवासासाठी स्तर 5 मधील कोणत्याही भागाकडे आत असल्यास किंवा त्या भागातून जात असल्यास व त्या भागामध्ये थांबा असल्यास, प्रवाशाकडे ई – पास असणे बंधनकारक राहील) नियमितपणे परवानगी राहील.
21. उत्पादन निर्यातीचे बंधन पूर्ण करण्याची आवश्यकता असलेल्या एमएसएमईसह निर्यात करणारे युनिट नियमितपणे सुरु राहतील.
22. उत्पादनाच्या अनुषंगाने:

a) अत्यावश्यक वस्तूंचे उत्पादन करणारे युनिट (आवश्यक वस्तू आणि कच्चा माल / पॅकेजिंगचे उत्पादन करणारे घटक म्हणून वर्गीकृत केलेल्या वस्तू व आवश्यक असलेल्या पुरवठ्याच्या साखळीसह)
b) सतत प्रक्रिया सुरु असणारे उद्योग (तात्काळ बंद न करता येणारे व मर्यादीत वेळेमध्ये सुरु करता न येणारे सर्व युनिट्स)
c) राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणासाठी महत्वपूर्ण असलेल्या वस्तूंचे उत्पादन
d) अत्यावश्यक गंभीर स्वरूपाच्या पायाभूत सेवा सुविधा देणारे डेटा सेंटर / क्लाऊड सेवा देणारे प्रदाता / आयटी सेवा नियमित सुरु राहतील.

23. उत्पादन क्षेत्रातील इतर सर्व उत्पादन युनिट, जे अत्यावश्यक सेवेत समाविष्ट केलेले नाहीत, परंतू निरंतर चालू ठेवणे आवश्यक आहे किंवा निर्यातक्षम आहेत, असे युनिट केवळ 50% कर्मचारी क्षमतेने व हालचाल ट्रान्सपोर्ट बबलने मर्यादीत अशा प्रकारे सुरु राहतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button