उरण येथे वट पौर्णिमा साजरी
उरण ( दिनेश पवार)
उरण शहर सह तालुक्यात सर्वत्र ठिकाणी महिलांनी वट वृक्षाची पूजा-अर्चा करून मनोभावे पूजा केली.
उरण शहरातील मोरा साई मंदिर जवळ, भवरा साल्ट ऑफिस जवळ, बोरी नाका पार, देऊळ वाडी, ग्राइंडवेल कॉलनी म्हातवली, कोटनाका राघोबादेव मंदिर जवळ, नागाव, केगाव चिरनेर आदी ठिकाणी असलेल्या वट वृक्षाची पूजा महिलांनी केली.
कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने काही महिलांनी वट वृक्षाची फांदी घरी आणून तुळशी वृदावनला बांधून व महिलांना वाण म्हणून वडाच्या पानांत आंबे, केली अलुबुकार जांभळे, महिलांना देऊन हळदी-कुंकू लाऊन वट पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. घरच्या-घरी आपल्या घरातच वडाची मनोभावे पूजा केली.
महिलांनी वट वृक्षास आंबा, फणसगरे, अलुबुकार, सफरचंद, करवंदे, जांभळे केळी, वेणी हार वाहून मनोभावे पूजन करून एक धागा वट वृक्षास बांधून वृक्षास ७ फेऱ्या मारल्या. महिलांनी एकमेकींना हळद-कुंकू लाऊन वडाच्या पानात फणस गरे, आंबे, अलुबुकार, केळी आदी देऊन वट पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.
पनवेल तालुक्यातील ओवळे येथील साई मंदिर जवळ असलेले मोठे वटवृक्षास गावातील महिलांनी यथासांग पूजा केली. तसेच तेथील महेश गुरुजींनी (भटजी) यांनी यथासांग पूजा सांगितली, पूजेचे महत्व सांगितले, महिलांनी पूजा कशी करावी – पूजा करण्यामागे हेतू काय अशा विषयी त्यांनी सांगितले. महिलांनी यथा सांग पूजा करून वटवृक्षाची मनोभावे पूजा करून आपल्या पतीला दिर्घायुष लाभो, कुटुंबातील सर्व सदस्यांना सुखी ठेव अशी पूजा केली.