शांतिनिकेतन पब्लिक शाळा (नवीन पनवेल) शाळेमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा दणका
-जोपर्यंतपालकांना न्याय भेटत नाही तोपर्यंत नवीन पनवेल शहर अध्यक्ष अनिकेत मोहिते मागे हटणार नाही.
पनवेल: गेल्या काही महिन्यांपासून शांतिनिकेतन पब्लिक शाळेमध्ये फी भरली नाही म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाइन क्लासेस मधून वंचित ठेवण्यात आले. शाळेकडून पालकांना सारखे सारखे सांगण्यात येते की जोपर्यंत फि भरत नाही तोपर्यंत तुमच्या मुलाला ऑनलाईन क्लासेस पासून वंचित ठेवण्यात येईल. वाईट तरी ह्या गोष्टीचा वाटतयं गेले तीन ते चार महिने हे पालक सातत्याने शाळेमध्ये येत आहेत कारण त्यांना त्यांच्या पाल्याला वंचित ठेवायचं नाही. काही पालकांची सध्या पूर्ण फी भरायची परिस्थिती नाहीये परंतु, शाळा प्रशासन जिल्हाधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या नियमावलींन दुजोरा न देता नियमांचे उल्लंघन करत आहे. तसेच पालकांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत आहेत. आज बघू, उद्या बघू, मॅनेजमेंटचा डिसिजन नंतर घेऊ, मॅनेजमेंट आज आलेले नाहीये, अशी उत्तर शाळा प्रशासनाकडून देण्यात येत आहे. मुळात ह्या शाळेला साधा मुख्याध्यापक सुद्धा नाहीये यावेळी.
१. आमच्या मुलाचं ऑनलाइन क्लासेस चालू करण्यात यावं.
२. ऑनलाइन क्लासेस पासून वंचित ठेवू नये.
३. फी ही टप्याटप्याने भरण्यात येईल त्यासाठी मुदत देण्यात यावी.
४.ॲक्टिविटी फी घेऊ नये कारण घरामध्ये सुद्धा योगा मुलांना दाखवू शकतो. आशा मागण्या करण्यात आल्या
तसेच निर्णय घेणारा सुद्धा एकही अधिकारी या शाळेमध्ये नाहीये याची खूप मोठी खंत आहे. कोणी सुद्धा उत्तर द्यायला तयार होत नाही वरच्या लोकांना फोन केले असता त्यांचा मोबाईल बंद किंवा मोबाईल उचलण्यास टाळाटाळ करत आहे. मग नेमका हा प्रश्न उपस्थित होतो शाळा प्रशासनाकडून जर पालकांना न्याय भेटत नसेल तर ह्या शाळेने मान्यता रद्द करावी. काय उपयोग ह्या शाळेचा जिथे माझे बिचारे पालक वर्ग गेले दोन महिन्यापासून भांडत आहेत, आमच्या मुलाला ऑनलाइन क्लासेसला आधी घ्या तरी सर्व पालकांचे एकच म्हणणं आहे. आमच्या मुलाला फुकट शिकवायचे नाही आहे, महिन्याला टप्प्याटप्प्याने जी काही फी असेल ती आम्ही भरणारच व आज सर्व पालक मला भेटले मी कोणत्याही क्षणाची न पाहता शाळेकडे धाव घेतली तसेच मी एक सांगू इच्छितो जोपर्यंत ह्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणास जोपर्यंत परवानगी मिळत नाही, तो पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष अनिकेत मोहिते ह्या सर्व पालकांच्या पाठीशी आहे. सर्व पालकांना न्याय मिळवून देणारच तसेच त्याप्रसंगी उपस्थित मंदार गोसावी (उपशहराध्यक्ष), विशाल दहातोंडे (सचिव), शार्दुल थोपटे, प्रतीक गाडेराव,आयुष घार्गे, सौरभ पाटोळे हे सर्व मनसैनिक उपस्थित होते. जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणारअसल्याचे अनिकेत मोहिते याने सांगितले आहे