सायन-पनवेल मार्गावरील वाहतूकीतील बदलाबाबत:
सायन-पनवेल मार्गावरील वाहतूकीतील बदलाबाबत:
उपरोक्त संदर्भिय वाहतूक नियंत्रण अधिसूचनेनुसार नवी मुंबई हद्दीत दिनांक 24/06/2021 रोजी संभाव्य कायदा व सुव्यस्थेची परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने सकाळी वेळ 8.00 व रात्रौ 20.00 वा. पर्यंत नवी मुंबईमध्ये येणाऱ्या व जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांची वाहतूक पूर्णत: बंद करण्यात आली आहे.
ज्याअर्थी सायन-पनवेल महामार्गावर उरणफाटा ते खारघर दरम्यान दोन्ही मार्गावर तसेच सिबीडी सर्कलकडे येणारे रस्ते किल्ला जंक्शनकडुन दिवाळेमार्गे, सिबीडी महाकाली चौकाकडुन, पार्क हॉटेलकडुन व जुने महानगरपालिका कार्यालयाकडुन या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहतूक सकाळी वेळ 8.00 ते रात्रौ 20.00 दरम्यान पुर्णत: बंद ठेवुन पर्यायी मार्गाने वळवणे आवश्यक असल्याचे नमुद केले आहे.
त्याअर्थी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सायन-पनवेल महामार्गावर उरण फाटा ते खारघर आणि किल्ला जंक्शन ते सिबीडी सर्कल चालणारे सर्व प्रकारचे बसमार्गात पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे.
वरील बदलाबाबतची सर्व चालक, वाहक व पर्यवेक्षकीय कर्मचारी व प्रवाशी जनता यांनी नोंद घेवून सहकार्य करावे.
मुख्य वाहतूक अधिकारी (नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम)