माजी शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी ह्यांच्या लसीकरण मोहिमेला लोकांचा उस्फुर्त प्रतिसाद:
रविवार दि. २०/६/२०२१ रोजी शिवसेना शाखा क्र.१, तुर्भे स्टोअर येथे कोव्हीड १९ लसीकरण मोहीम माजी शिवसेना नगरसेवक सुरेश कुलकर्णी ह्यांनी राबिवली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ४५ वर्षावरील नागरिकांना मोफत कोविड लसीकरण करण्यात आले. लसीकरणाला नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हि लसीकरण मोहीम यशस्वी केली.
यावेळी नागरिकांनी सुरेश कुलकर्णी ह्यांच्या कार्याची प्रशंसा केली. ह्यावेळी प्रत्येकाच्या बोलण्यातून असे दिसून आले कि तुर्भेमध्ये लोकांच्या कोणत्याही प्रॉब्लेमच सोलुशन सुरेश कुलकर्णी साहेब आहेत.
नवी मुंबई वार्ताशी बोलताना सुरेश कुलकर्णी साहेबांनी सांगितले कि, “खास करून शिवसेना शाखा क्र.१ मध्ये, नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवली कारण येथील लोकांच्या मनात लसीकरणाबाबत काही प्रश्न आहेत, लोक भीती पोटी लसीकरण करून घेत नाहीत. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन सर्वाना लसीकरणाचे महत्व पटवून दिले. कोरोनापासून बचावासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग आहे. त्यामुळे सर्वानी लसीकरण करून घ्यावे जेणेकरून स्वतःचे, कुटुंबाचे आणि समाजाचे आरोग्य चांगले राहील.”
ह्याप्रसंगी सुरेश कुलकर्णी साहेबांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ह्यांनी कोरोना महामारीत ज्या प्रकारे काम केले त्याची खास करून प्रशंसा केली.