महाराष्ट्र

मतदार यादीतील छायाचित्र नसलेली नावे वगळणार:

उरण (दिनेश पवार)

मा. निवडणूक आयोगाकडून मतदारांचे फोटोसहीत मतदार यादी अद्यावत करणेबाबतच्या सुचना प्राप्त झालेल्या आहेत. १९० उरण विधानसभा मतदार संघात उरण तालुक्यातील १४१ मतदान केंद्रांमध्ये ५१५१ मतदारांचे फोटो मतदार यादीमध्ये नाहीत. फोटो नसलेल्या मतदारांनी त्यांचे फोटो केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उरण यांजकडे तात्काळ जमा करावेत किंवा तहसिल कार्यालय उरण येथे निवडणूक शाखेत जमा करावेत. तसेच अनेक मतदार स्थलांतरीत असल्याचे केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उरण यांचे निदर्शनास आले आहे. सदर स्थलांतरीत मतदारांचे पंचनामे केंद्र स्तरीय अधिकारी कडे वर्ग करण्यात आलेले आहेत. सदर मतदारांची यादी राजकीय पक्षाचे प्रतिनिधी यांना देण्यात आली आहे. तरी मतदार यादीमध्ये फोटो नसलेल्या मतदारांनी त्यांचे फोटो केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) कडे अथवा तहसिल कार्यालय उरण येथे ३० जुन २०२१ पर्यंत जमा करावेत अन्यथा सदर मतदार स्थलांतरीत आहेत असे गृहीत धरून त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्यात येतील असे आवाहन मतदान नोंदणी अधिकारी १९० उरण विधान सभा मतदार संघ श्रीमती अश्विनी पाटील, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी १९० उरण विधानसभा मतदार संघ तथा तहसिलदार भाऊसाहेब अंधारे, निवडणूक नायब तहसिलदार उरण आशा म्हात्रे, यांनी केले आहे.

या अनुषंगाने शुक्रवार (दि. १८) रोजी उरण तहसील कार्यालयात उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक, राजकीय पक्षाचे प्रतिनिधी,आदी उपस्थित होते.

या वेळी तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, निवासी नायब तहसिलदार उरण संदीप खोमणे, निवडणूक नायब तहसीलदार उरण आशा म्हात्रे, उरण नगरपरिषद नगराध्यक्षा सायली म्हात्रे, नगरसेवक धनंजय कडवे, नगरसेवक नंदु लांबे, नगरसेविका यास्मिन गॅस, उरण तालुका कॉंग्रेस अध्यक्ष जे. डी .जोशी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button