‘स्टोरीटेल मराठी’ वर आस्ताद काळेच्या आवाजात ‘चेकमेट’ चा रहस्यमय थरार!
– ‘स्टोरीटेल मराठी’ वर आस्ताद काळेच्या आवाजात ‘चेकमेट’ चा रहस्यमय थरार!
– ‘स्टोरीटेल मराठी’ वर नव्या ओरिजनल ऑडिओबुक मालिकेचा सस्पेन्स!
जून महिन्यात स्टोरीटेल मराठीवर प्रसिद्ध होणाऱ्या “चेकमेट” या कमाल ऑडिओबुक्स मालिकेतील थरारक अनुभव रसिकांना त्यांच्या आवडत्या ऑडिओबुक्स प्रकारात ऐकता येणार आहेत. आपला आवडता युवा अभिनेता आस्ताद काळे त्याच्या भारदस्त आवाजात हा थरारक अनुभव स्टोरीटेलवर ऐकविण्यासाठी येत आहे. त्याच्या आवाजातील ही मालिका विशेष असून लेखक श्रीपाद जोशी आणि जयेश मिस्त्री यांनी ही नवी ओरिजनल ऑडिओबुक मालिका लिहिली आहे.
कविताला पैशांसाठी निनावी कॉल्स येत आहेत. “पैसे नाही दिले तर तुझा आणि तुझ्या फॅमिलीचा गेम खल्लास…” तिचं राजेश नावाच्या एका माणसासोबत दुसरं लग्न ठरलंय… राजेशच्या हस्ते फोन करणाऱ्याला पैसे देऊनही धमकीच्या कॉल्सचं सत्र सुरुच आहे. पण मग कविताचा असा कोण शत्रू आहे? त्याला नक्की पैसेच हवेत की अजून काही? तिच्या पहिल्या नवऱ्याचा कुणी बिजनेस रायव्हल तर नसेल? पोलिसांनाही तो चमका देतो. आहे तरी कोण हा?… आता ही केस आलीय इन्स्पेक्टर अभिमन्यू प्रधानकडे… आशिष गायतोंडे मर्डर केस (Murder Case) सोडवल्यानंतर अभिमन्यूकडून पोलिस डिपार्टमेंटच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. अभिमन्यू त्या शातीर गुन्हेगराला पकडू शकेल का? तुम्हाला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी, आपल्या आवडत्या आस्ताद काळेच्या भारदस्त आवाजात ‘स्टोरीटेल मराठी’वर ‘ऑडिओबुक’मध्ये ऐका अंगावर शहारे आणणारी सस्पेन्सफुल क्राईम ‘स्टोरी ‘चेकमेट’
‘चेकमेट’ या ओरिजनल ऑडिओबुक मालिकेचे वाचन करणारे आघाडीचे युवा अभिनेते आस्ताद काळे सांगतात “‘स्टोरीटेल मराठी’साठी ‘चेकमेट’ वाचताना खूप मजा आली. ‘चेकमेट’ वाचण्यापूर्वीच मी श्रीपाद जोशी आणि जयेश मिस्त्री यांच्या मर्डर मिस्ट्रीचे ‘स्टोरीटेल मराठी’साठी पूर्वी वाचन केले होते. आणि त्याच्यातही खूप थरारक आणि उत्कंठावर्धक लेखन होतं. ‘चेकमेट’ ही मालिका तशी लहान आहे पण थरार आणि उत्कंठा ताणून धरणारी आहे. ‘ऑडिओबुक’ या माध्यमासाठी वाचन करताना मला कायम चॅलेंजिंग वाटतं. यात वेगवेगळी कॅरेक्टर्स करायला मिळतात. हे श्रवणाचे माध्यम असल्याने त्यात दृश्य, प्रसंग, जागा, देहबोली हे सगळंच उभं करायचं असतं फक्त आवाजातून. आणि ते फार मजेदार आहे. काही कॅरेक्टर्स आधीच्या गोष्टींतील याही गोष्टीत आहेत. अभिमन्यू प्रधान हे मुख्य इंस्पेक्टरचे पात्र आहे, पाटील हे हेड कॉन्स्टेबल आहेत त्यांचे आवाज, त्यांच्या बोलण्याचा लहेजा पुन्हा तसाच्यातसा लक्षात ठेवून कॅरी करता आला आहे. एकूणच मला या माध्यमाचं विशेष आकर्षण वाटतंय. फक्त आवाज वापरून सगळं ऊभ करायचं हे एक कलाकार म्हणून खूप आव्हानात्मक आहे. लोकांनी ते ऐकून त्यांचा बरा-वाईट फीडबॅक नक्की द्यावा, म्हणजे कलाकार म्हणून मला सुधारण्याला वाव मिळेल.”
मराठी ओरिजनल ऑडिओबुक मालिकातील थरार आणि रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला ‘स्टोरीटेल’ डाउनलोड करावे लागेल. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठी पुस्तके ‘सिलेक्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.