फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या वतीने ३०० महिला कोव्हीड योद्धयांचा सन्मान:
दिनांक १५ जून रोजी, नवी मुंबई महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त सौ. सुजाता ढोले यांच्या शुभहस्ते वाशी रुग्णालयातील परिचारिका व महिला सफाई कर्मचारी अशा एकूण ३०० महिलांचा (कोविड योद्ध्या) फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या वतीने कोविडचे सर्व नियम पाळुन साड्या व सन्मान-पत्र देऊन सन्मान करण्यात आला.
अभय धोंडीराम वाघमारे संस्थापक असलेल्या फ्युचर फर्स्ट फाउंडेशनच्या वतीने नेहमी काही ना काही समाजोपयोगी उपक्रम राबिवले जातात. अभय ह्यांना वडील माजी आमदार कै. धोंडीराम वाघमारे ह्यांचा समाजकल्याणाचा वारसा लाभला आहे. अभय वाघमारे ह्यांनी गेल्या वर्षी लॉकडाउन मध्ये प्राणी-मात्रांची खूप काळजी घेतली. तसेच त्यांची अकॅडेमी कोरोना काळात लहान मुलांसाठी मोलाचे कार्य करत आहे. अभय वाघमारे हयांनी नुकतेच youtube चॅनल चालू केले आहे जेणेकरून सर्वाना घरी बसून व्यायामाचे सायन्टिफिक प्रकार माहिती पडतील.
या प्रसंगी प्रशासन विभागाचे उपायुक्त श्री. दादासाहेब चाबूकस्वार, वाशी विभागातील वॉर्ड ऑफिसर श्री. महेश शेट्टी तसेच वाशी हॉस्पिटलचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. प्रशांत जवादे उपस्थितीत होते.