महाराष्ट्र

रानभाज्यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह

उरण (दिनेश पवार)

शहरी नागरिकांची गावटी भाजीला जास्त मागणी असल्याने उरण शहरामध्ये रानभाज्यांच्या विक्रीतून आदिवासी बांधवांचा उदरनिर्वाह होत आहे. पावसाळा सुरु झाला की औषधी, गुणकारी, रान माळावरील विविध पालेभाज्या (रानभाज्या) उरण शहरात विकावयास येतात. या रानभाज्यांना मागणी खूप असते. उरण शहरातील राजपाल नाका, आनंद नगर कॉर्नर येथे ह्या भाज्या मोठ्या प्रमाणात विकायला येतात.

या भाज्या चवीला रुचकर असतातच शिवाय आरोग्यासाठी त्या पौष्टिक आणि औषधीसुद्धा असल्याने या भाज्यांना महत्त्व असते. पावसाळ्याच्या सुरुवातीला जंगल अथवा माळरानावर रानभाज्या उपलब्ध होत असल्याने आदिवासी ठाकूर महिला, पुरुष वर्ग सकाळी जंगल व माळरानात जाऊन रानभाज्या गोळा करीत त्या खवय्यासाठी बाजारात आणून त्यांची विक्री करत त्यापासून मिळणाऱ्या पैशामध्ये आपल्या कुटुंबाचे आदिवासी बांधवाचे उदरनिर्वाहचे साधन बनले आहे. या भाज्यांना बाजारपेठेत मोठी मागणी असल्याने आदिवासींना रोजगार मिळाला आहे.

पावसाळ्यातच येणाऱ्या रानभाज्यांमध्ये औषधी गुणधर्म:

● पहिला पाऊस पडला की डोंगराळ भागात रान माथ्याला ज्या भाज्या तयार होतात, त्याना रानभाज्या असे म्हटले जाते. या भाज्यांची चव अनोखी तसेच त्यात औषधी गुणधर्म असल्यामुळे या भाज्यांच्या खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसतो. यामध्ये कुलू, अंबाडी, शेवळी टाकला, भारंगी, शेवळी व कंटोळी आदीसह अन्य रानभाज्याचा समावेश होत असतो.

● या भाज्या उरण तालुक्यातील आदिवासी महिला डोंगराळ भागातून बाजारात विक्रीसाठी आणत असून उरण शहरातील राजपाल नाका, आनंद नगर बाजारपेठ आदी ठिकाणी रानभाज्याची महिला विक्री करत असुन या रानभाज्याची चव घेण्याकरिता ग्राहक खरेदीसाठी झुंबड करत असल्याने आदिवासी बांधवाना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत असल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे. हातावर पोट असल्याने कोरोना काळात या आदिवासींचे हाल झाले. पण आता या रानभाज्यांच्या विक्रीतून काही प्रमाणात का होईना त्यांना दिलासा मिळाला आहे.

– सौ. वासंती कातकरी, डाउर नगर, कातकरी वाडी (उरण) सांगतात कि “आम्ही पावसाळ्यात रानभाज्या गोळा करण्यास डोंगर भागात जातो परंतु दिवसेनदिवस डोंगर कमी होत चालल्याने भाज्या दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. कुलू भाजी ५० रुपयास ३ जुड्या, टाकला,अंबाडी, कुर्डू प्रत्येकी जुडी १० रुपये, कांद वाटा ५० ते ७० रुपये अश्या भावाने आम्ही विकतो. कंटोळी ५० ते ६० रुपये पाव किलो, शेवळी २० रुपये जुडी अशा भावाने आम्ही विकतो. भाज्या महाग असल्या तरी लोक खरेदी करतात. रान भाज्यांना मागणी खूप असते.”

– सौ. हर्षला हेमंत भोंबळे गृहिणी, बालई (उरण) सांगतात कि “पहिल्याच पावसात येणाऱ्या रानभाज्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांचा कल हा रानभाज्या खरेदीकडे असतो. वर्षात एकदाच्मिल्णारी रानभाजी म्हणजे पर्वणीच होय. आम्ही दरवर्षी भाजी खरेदी करतो. पावसाळ्यातील मिळणारी भाजी हि बिन खताची असत. यामुळे उरण तालुक्यातील शहरात मोठ्या प्रमाणात रानभाज्याची विक्री होत असून याद्वारे आदिवासी ठाकूर लोकांना चांगला रोजगार उपलब्ध होतो. विकलेल्या भाजीपासून मिळणारे उपन्न (पैसे) त्यातून घरातील लागणाऱ्या किराणा व इतर साहित्य आदिवासी लोक खरेदी करीत असतात.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button