प्रभाग क्रमांक ५८, सेक्टर १४ व १५, एम.जी. कॉम्प्लेक्स वाशी येथे कोव्हीड १९ लसीकरण शिबीर संपन्न:
नवी मुंबई प्रतिनिधी: दिनांक ४ जून आणि ५ जून रोजी, लोकनेते माननीय आमदार गणेशजी नाईक साहेब ह्यांच्या शुभहस्ते ह्या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. फोर्टिज हॉस्पिटल, वाशी यांच्या सहकार्याने माजी नगरसेवक प्रकाश मोरे आणि माजी नगरसेविका शिल्पा मोरे ह्यांच्या वतीने ह्या शिबिराचे आयोजन केले गेले. ह्या शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरात वय वर्षे १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोव्हीड १९ (कोव्हीशील्ड) लसीचा पहिला डोस देण्यात आला.
नगरसेवक भाऊ मोरे ह्यांना “आपला माणूस! आपला भाऊ!!” ह्या नावाने ओळखले जाते. भाऊंनी कोरोना काळात खूप मोठ्या प्रमाणात लोकांना मदत कार्य केले. भाऊंनी स्वतःच्या जीवाची तसेच परिवाराची पर्वा न करता निस्वार्थी मदतकार्य सुरु ठेवले आहे. कित्येकदा ते कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात गेले तेव्हा त्यांना पण कोरोनाची लागण झाली होती. लहान मुले असुंदेत किंवा मोठी माणसे भाऊ सर्वांचे लाडके आहेत असे प्रभाग क्रमांक ५८ मध्ये मानले जाते.
नवी मुंबई वार्ताशी बोलताना नगरसेवक प्रकाश मोरे ह्यांनी सांगितले कि “प्र.क्र.५८, सेक्टर १४ व १५ मधील रहिवाशी, बंधू-भगिनी तसेच तरुण-तरुणींनी ह्या लसीकरण शिबिराचा मोठया संख्येने फायदा घेतला. लसीकरण हा एकमेव उपाय आहे, जो स्वतःला तसेच आपल्या कुटुंबाला कोरोनापासून सुरक्षित ठेवू शकतो. त्यामुळे मी सर्वाना आवाहन करतो कि सर्वानी लसीकरण करून घ्यावे. अजूनही कोणी वॅक्सीनेशन करून घेतले नसेल त्यांनी त्वरित आपल्या आधार कार्डची झेरॉक्स व आपला मोबाईल नंबर लिहून एम.जी. कॉम्प्लेक्स मधील माझ्या जनसेवा कार्यालयात सायं ६-८ ह्या वेळेत आणून द्यावेत, ही नम्र विनंती.”
यावेळी प्रभाग क्रमांक ५८ मधील, सर्व सोसायटी / अपार्टमेंट्स मधील मान्यवर पदाधिकारी / कार्यकर्ते उपस्थित होते.