नवी मुंबई

खारघर पोलीस ठाणे कडून सर्व नागरिक व पर्यटक यांना जाहीर आव्हान

खारघर पोलीस ठाणे कडून सर्व नागरिक व पर्यटक यांना जाहीर आव्हान करण्यात येते की, खारघर मधील डोंगर भागात पावसाचे पाणी पडल्यामुळे मोठया प्रमाणात पाण्याचे झरे निर्माण होऊन, खारघर परिसरातील पांडवकडा, चाफेवाडी, फणसवाडी, ड्रायव्हिंग रेंज, घामोळे गाव, ओवे कॅम्प डोंगर व धरण परिसर तळोजा जेल समोर डोंगर व तळोजा समोरील तलाव तसेच आजूबाजूच्या परिसरात पावसाचे लहान-मोठे धबधबे चालू होतात त्यामुळे पावसाळी पर्यटनाचे स्वरूप प्राप्त होते, तेव्हा डोंगरावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे पांडवकडा, चाफेवाडी,फणसवाडी व ओवे काम धरण व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर धबधबे तयार होतात.

सदर ठिकाणावर दर शनिवार, रविवार, इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी पर्यटक या धबधब्याच्या धारेखाली बसण्यासाठी येथे जमा होतात, पाण्याच्या डोहात पोहण्यासाठी जातात तेव्हा पाण्याच्या धबधब्या सोबत डोंगरावरील दगड घरंगळत येऊन धबधब्याखाली बसलेल्या पर्यटकांच्या डोक्‍यात पडून त्यांना गंभीर दुखापती होतात तसेच सदर परिसरात जमा झालेल्या पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक पर्यटक पाण्यात बुडून मृत्यू झालेले आहे. मागील वर्षी 4 तरूणी पाण्यात बुडून मृत्यु पावल्या होत्या, अशा घटना होऊ नये याकरता मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी सो. पनवेल विभाग, नवी मुंबई, यांचेकडून फौजदारी प्रक्रिया सहिताचे कलम 144 प्रमाणे दिनांक 07 जून 2021 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मनाई आदेश लागू करण्यात आलेले आहेत,

तरी याद्वारे सर्व खारघर रहिवाशी व पर्यटक यांना सुचित करण्यात येते की सदर प्रतिबंधित क्षेत्रात पर्यटन करताना कोणी व्यक्ती मिळून आल्यास त्यांच्यावर खारघर पोलीस ठाणेकडून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांनी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button