पोस्टल स्टाफ असोसिएशने मानले कार्यसम्राट माजी नगरसेवक राजू भैया शिंदे यांचे आभार:
वाशी: दिनांक ३१ मे २०२१ रोजी टपाल खात्याची इमानेइतबारे सेवा करून श्री. कदम साहेब व श्री. मोहिते साहेब हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्त पोस्टल असोसिएशन वाशी तर्फे त्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.
टपाल कर्मचाऱ्यांवर विशिष्ट प्रेम आणि आपुलकी म्हणून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आपले सर्वांचे लाडके माजी नगरसेवक माननीय राजू भैया शिंदे (माजी आरोग्य सभापती) यांना आमंत्रित केले होते.
यावेळी सुशांत नारकर (मा. उपसचिव महाराष्ट्र सर्कल NFPE संघटना), असोसिएशनचे अध्यक्ष श्री. धंदारे, कार्याध्यक्ष श्री. वाडकर, सचिव श्री. वाघमारे, खजिनदार श्री. बनकर, श्री. मिसाळ, श्री. फुलवलकर, श्री. पाटील, श्री. मोजर आदी मान्यवर उपस्थित राहून सत्कार मूर्तींना सेवानिवृत्तीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन, पुढील आयुष्य सुखसमाधानाचे जावो ह्यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना केली.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री. राजू भैया शिंदे यांनी लावल्याबद्दल त्यांचे विशेष आभार तसेच साहेबांचे भविष्यात सुद्धा आपल्यावर असेच प्रेम व साथ राहील अशी आशा, पोस्टल स्टाफ असोसिएशन, वाशी ह्यांनी व्यक्त केली.