सामाजिक कार्यकर्ते आकाश जगताप ह्यांच्या शुभहस्ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न:
पर्यावरण संवर्धनाविषयी जणजागृती निर्माण करणे यासाठी जगभरात अनेक देशात दरवर्षी ५ जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून ओळखला जातो.
जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते आकाश जगताप ह्यांनी खास वेगळा उपक्रम राबविला. त्यांनी स्वतः लहान मुलांना सोबत घेऊन सेक्टर ३, कोपरखैरणे परिसरात स्वच्छता अभियान हाती घेवुन छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, कोपरखैरणे येथे झाडे लावली. छत्रपती शिवाजी महाराज उद्यानामध्ये सर्व झाडांची त्यांनी काळजी घेऊन निगा राखली.
नवी मुंबई वार्ताशी बोलताना, आकाश जगताप म्हणाले कि, “ह्या अभियानामुळे लहान मुलांमध्ये पर्यावरणाप्रती जनजागृती व प्रेम निर्माण होईल.,” तसेच आज ६ जून आपण शिवराज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा करतो. शिवराज्याभिषेक दिनी रयतेच्या या अद्वितीय राजास माझा मानाचा मुजरा! शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनःपूर्वक शुभेच्छा.”🚩🚩🚩🚩
यावेळी मोठ्या संख्येने लहान मुले उपस्थित होती. कोरोनाचे सर्व नियम पाळून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पडला.
असेच कार्य करत रहा खूप छान दादा तुला खूप खूप शुभेच्छा ❤️
thanku so much
Happy to see u like this
आपण असाच नवी मुंबई वार्ता वाचावा हि विनंती