नवी मुंबई

उच्चशिक्षणासाठी परदेशात जाणा-या आणखी 67 विद्यार्थ्यांचे विशेष सत्रात लसीकरण

उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणा-या विद्यार्थ्यांची कोव्हीड लसीकरण न झाल्यामुळे अडचण होऊ नये व शैक्षणिक संधी वाया जाऊ नये महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली 31 मे रोजी सेक्टर 15 नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात आयोजित केलेल्या विशेष लसीकरण सत्राचा लाभ परदेशी विद्यापिठात प्रवेश मिळालेल्या 252 विद्यार्थ्यांनी घेतला होता.

तथापि या संधीपासून आणखी काही विद्यार्थी असल्यास ते वंचित राहू नये याकरिता दि. 03 जून रोजी आयोजित केलेल्या विशेष लसीकरण सत्रात 40 युवक व 27 युवती अशा एकूण 67 विद्यार्थ्यांनी लसीकरणाचा लाभ घेतला. नवी मुंबई महानगरपालिकेने आमच्या शैक्षणिक कारकिर्दीचा विचार करून 2 वेळा विशेष लसीकरण सत्र आयोजित केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button