मनोरंजन

अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात स्टोरीटेलवर ऐका “आनंदयात्री – पोलीस अधिकाऱ्याची डायरी”

जगभरातील सर्वोत्कृष्ठ आणि दर्जेदार साहित्यकृती नव्या ऑडिओबुक तंत्रज्ञानात जगभरातील साहित्यप्रेमींसोबतच मराठी साहित्यरसिकांना स्टोरीटेलवर भुरळ घालत आहेत. प्रख्यात मराठी साहित्यिकांच्या गाजलेल्या अलौकिक कथा- कादंबऱ्या ऐकण्याची नामी संधी ‘स्टोरीटेल मराठीवर’ सातत्याने साहित्यप्रेमी श्रोत्यांना उपलब्ध होत आहेत. या महिन्याच्या सुरुवातीलाच आयपीएस अधिकारी जयंत नाईकनवरे यांच्या ‘आनंदयात्री : पोलिस अधिकाऱ्याची डायरी’ ही थक्क करण्यारी अनुदिनी प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या धीरगंभीर आवाजात ‘स्टोरीटेलच्या ऑडिओबुकमध्ये ऐकायला मिळणार आहे.

एकीकडं जाती-धर्मावर आधारित व्यवस्थेला घरघर लागली असताना उत्क्रांतीच्या या घुसळणीतून एक कट्टर धर्म मात्र तयार झाला आहे, तो म्हणजे पोलीसधर्म ! ‘इन्साफ’ हा या धर्माचा देव, ‘सुव्यवस्था’ ही देवी, तर ‘बंदोबस्त’ही त्याची आरती आहे. त्यांच्या टेन कमांडमेन्ट्स राज्यघटनेकडून आल्या. या पुस्तकात लेखक – जयंत नाईकनवरे (IPS) याच पोलीस धर्माबद्दल सांगत आहेत. त्यांच्या अनुभवातून आलेले हे लिखाण प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या आवाजात ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर ऐकताना श्रोत्यांना नक्कीच आवडेल.

साहसी, थरारक काही लिहिणं हा या पुस्तकाचा हेतू नाही, हे लेखकाने प्रस्तावनेतच स्पष्ट केलं असलं तरी, त्यांच्या कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या घटनांना ते जाता जाता स्पर्श करतात. वर्धा येथे असताना पोलिस अधिकाऱ्याची पोलिसांनीच केलेली हत्या, कल्याण परिसरातली संघटित गुन्हेगारी, मुंबई हल्ल्याची रात्र… या गोष्टींबद्दल त्यांनी लिहिलं आहे. २६ डिसेंबरच्या काळरात्रीनंतर पहाटे, त्यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणाऱ्या अशोक कामटे यांचा मृतदेह पहावा लागला, त्या क्षणाचं वर्णन त्यांनी अत्यंत कमी शब्दांत आणि इतकं नेमकं केलं आहे, की सचिन खेडेकरांच्या हळुवार आवाजात ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर ऐकताना आपणही हेलावून जातो.

यानिमित्तानं लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांनी या पुस्तकाबद्दलचा अनुभव कथन केला आहे. ते म्हणतात “कृष्णाची गीता वेगळी आणि प्रत्येक माणसाची गीता वेगळी, तशी तुमची ही गीता वेगळी आहे. कारण प्रत्येकाचं जगणं वेगळं आहे. काही अंशी ती माझ्या आयुष्याशी मिळतीजुळती आहे”

आपल्या आवडीची नवनवी ऑडिओबुक्स ऐकण्यासाठी सहज आणि सोप्या पद्धतीने गुगलप्ले स्टोअर किंवा ॲपस्टोअरवर जाऊन ‘स्टोरीटेल’ हे ॲप डाऊनलोड करून किंवा www.storytel.com या वेबसाईटवर जाऊन हे डाऊनलोड करून सहज ऐकता येतील.

‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्या रसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे. दरमहा फक्त रू. २९९/- मध्ये मराठी, इंग्रजीसह सर्व भारतीय भाषांतील ऑडिओबुक्स किंवा दरमहा फक्त रू.१४९/- मध्ये, मराठी पुस्तके ‘सिलेक्ट मराठी’ योजनेत मिळतात. ऑडिओबुक्स कुठेही, कितीही व कधीही ऐकता येतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button