शिवसहयाद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था, आयोजित “सायकल चालवा – शहर वाचवा – सुदृढ रहा” अभियान संपन्न:
जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून, शिवसह्याद्री ऐक्यवर्धक सामजिक सेवा संस्था आयोजित “सायकल चालवा – शहर वाचवा – सुदृढ रहा” अभियानाला आजपासून सुरुवात झाली. जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर सगळ्यांचे खाच्चिकरण होत आहे. समाजाचे तन, मन सुदृढ राहावे आणि पर्यायाने शहर प्रदूषण मुक्त करण्यासाठी एक पावूल पुढे, यासाठीच या उपक्रमाचे आयोजन केले गेले. समाजात सायकल चालवण्याविषयी जन जागृती (अवेअरनेस) निर्माण करण्यासाठी ह्या अभियानाचा उपयोग होईल.
आज सकाळी नवी मुंबई महानगरपालिका, बेलापूर येथून या सायकल रॅलीला सुरुवात झाली. या सायकल रॅलीला NRI पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. रवींद्र पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. ते हि या सायकल रॅलीमधे सहभागी झाले होते. तसेच पिंकथोनच्या ब्रँड ॲम्बेसेडर नीलिमा काळे या ही यावेळेस उपस्थित होत्या. कोरोनासंदर्भातील सरकारने घालून दिलेले सर्व नियम आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळून या सायकल रॅलीचे आयोजन केले गेले.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष प्रा. वर्षा भोसले, प्रभा पाटील, प्रताप नाना पिसाळ, मनिषा भोसले, दीपक शिंदे, किसन मोरे, साहेबराव कदम, फुलंन शिंदे, रुचिका घाडगे व रोशनी पाटील उपस्थित होते.
संस्थेचे सचिव राजेश घाडगे यांच्या संकल्पनेतून जुन्या सायकल जमा करून, त्या दुरुस्त करुन गरजू विद्याथ्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचा मानस आहे.
शिवसहयाद्री ऐक्यवर्धक सामाजिक सेवा संस्था ही सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या चार जिल्यातील लोकांचे एकत्रीकरण करून त्यांचे सक्षमिकरण करण्यासाठीसाठी कटिबध्द आहे. संस्थेतर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात.