महाराष्ट्र

कोरोनामुळे निधन झालेल्या लांज्यातील कै. रमेश दाभोळकर यांच्या मुलांना लोकनेते अविनाश दादा लाड यांनी घेतले दत्तक:

– कोरोनामुळे निधन झालेल्या लांज्यातील कै. रमेश दाभोळकर यांच्या मुलांना लोकनेते अविनाशदादा लाड यांनी घेतले दत्तक:
– कुर्णे पडयेवाडीतील कै. रमेश दाभोळकर यांच्या कुटूंबियांना दिला आधार

लांजा: लांजातील तालुक्यातील कुर्णे पडये वाडीतील कै. रमेश दाभोळकर यांचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले असून त्यांचे संपुर्ण कुटंब अडचणीत आले आहे. याप्रसंगी नवी मुंबईचे माजी उपमहापौर, लोकनेते मा. श्री अविनाश दादा लाड यांनी कै.दाभोळकर यांच्या पाल्यांना दत्तक घेतले असून अशा कठीण प्रसंगी कुटंबियांच्या पाठीशी उभे राहणारे लाड हे तालुक्यातील एकमेव नेते आहेत. त्यांनी केलेल्या या समाजकार्याबद्दल लांजा तालुक्यासह कुर्णे गावातील नागरिकांनी आभार मानले आहेत.

लांजा तालुक्यातील कुर्णे गाव, पडये वाडीतील ग्रामस्थ कै. रमेश दाभोळकर यांचे कोरोना संसर्गामुळे नुकतेच निधन झाले आहे. दाभोळकर घरातील एकमेव कमवती व्यक्ती असल्याने त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. कै. रमेश दाभोळकर यांच्या पश्चात स्वतचे वयोवृद्ध वडील, दोन मुली आणि अपंग विकलांग मुलगा आहे. दाभोळकर यांच्या पत्नीचे यापुर्वीच निधन झाले होते. पत्नीचे निधन झाल्यानंतर मुलांचे पालनपोषणाची जबाबदारी कै. दाभोळकर यांच्यावर होती. मात्र त्यांचेही कोरोनामुळे निधन झाल्याने आता वयोवृद्ध वडील मुलांचा संभाळ कसा करणार, असा प्रसंग या कुटूंबावर आला होता.

मात्र नवी मुंबईचे माजी उपमहापौर तथा स्थानिक लोकनेते मा. श्री. अविनाशदादा लाड यांना समाजसेवक चंद्रकांत करंबेळे यांच्यामार्फत माहीती मिळाली. मा. श्री अविनाश दादा लाड यांनी तातडीने दाभोळकर कुटूंबियांची भेट घेत आर्थिक स्वरुपातील मदत, किराणा किट आणि मोठ्या मुलीच्या शिक्षणाचा संपुर्ण खर्च उचलणार असल्याचे सांगितले. त्यामुळे कुर्णे गाव तसेच लांजा तालुक्यातील नागरिकांनी लोकनेते श्री अविनाश दादा लाड यांचे मनपुर्वक आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button