जनसामान्यांचा नेता : अविनाश लाड साहेब
अविनाश लाड साहेब हे नाव ऐकलं की आपल्या समोर दिसते असे व्यक्तिमत्व कि जे संकट समयी लोकांच्या मदतीसाठी धावून येते. त्यांनी देवळे येथील पीएसी हाॅस्पिटलला ऑक्सिजन बाटला, बेड, पीपी कीट, सेनिटायजर, टेम्परेचर मशिन, स्टिमर, थर्मल गण, ऑक्सीमिटर अशी अनेक कोरोना सामुग्री उपलब्ध करून दिली आहे. गोरं गरिब जनतेला जीवनावश्यक कीटचे वाटप केले, २५०० लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. तसेच कोरोना काळात घराचा कर्ता निघून गेला आहे अशा मुलांचा शैक्षणिक खर्च ते स्वतः जातिनिशी लक्ष घालून उचळत आहेत. मेंघी, कनकाडी, दाभोळे, देवळे, चाफवली येथील लोकांनी मनापासून त्यांचे आभार मानले.
अविनाश लाड साहेब यांनी सांगितले कि माझ्या हातातून असेच सामाजिक कार्य नेहमी होत राहील तसेच उद्योग, गावातील पुरक व्यवसाय यांनाही जी मदत करता येईल ती ही केली जाईल, जगाच्या पोशिंदा जगाला पाहिजे असे मत व्यक्त केले.
गरीब, अपंग, गरजू लोकांकरिता मोफत अन्नदान करतंच राहाणार असेही त्यांनी बोलून दाखवले. या संकटाला सामोरे जावून भविष्य घडविण्यात आपले यश आहे. निराश होवून जीवन संपवीण्याचा विचार कोणीही करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाला कॉग्रेस नेते अविनाश लाड साहेब, जि.प.मा.सदस्य व कोंडगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच. मा. श्री.बापू शेटे .मा. कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष मा. श्री. राजेश पत्त्याने, व कनकाडी ग्रामपंचायत सरपंच व कॉंग्रेसचे जिल्हा सचिव संतोष गोताड, मा.नुईद काझी विधानसभा अध्यक्ष राजापूर, मा. बापू लोटणकर पुर्ये उपसरपंच, दाभोळे सरपंच मा. राजेश रेवाळे, किरण दाभोलकर उप सरपंच मेघी सरपंच मा. प्रमिल चव्हाण, चाफवली ग्रामपंचायत सदस्य मा. विनायक चालके, मा.सुरेश शिंदे मा. सरपंच घाटीवले, संकेत माईल, उप सरपंच वाघनगाव उर्मिला शिंदे ग्रामपंचायत सदस्य, प्रदीप गुरव ग्रामपंचायत सदस्य, संदेश जाधव मा. उपसरपंच गंगाराम केसरकर, मा. सरपंच प्रमोद ब्रेद्रे, प्रकाश रेवाळे, देवळे पो.पा. विजय साळवी, पत्रकार अमित पंडित, संजय बेलकर, व डॉ रसाळ, डॉ जाधव व सुपर वायजर जंगम यांनी हे साहित्य ताब्यात घेतले. डॉ लाड साहेब यांनी आवर्जून कौतुक केले.असंख्य कार्यकर्ते व गावातील लोक उपस्थित होते.