नवी मुंबई
खाजगी शाळांबाबतच्या तक्रारी निराकरणासाठी शिक्षण विभागाचे नियोजन
कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे तसेच वाढत्या प्रादुर्भावामुळे नवी मुंबईतील सर्वच शाळा शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये ऑनलाईन सुरु आहेत. खाजगी शाळेतील पालकांकडून शाळांबाबत विविध तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे या तक्रारींचे तात्काळ निराकरण करणेच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने विभागनिहाय केंद्र समन्वयकांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
तरी, खाजगी शाळांबाबत असणा-या तक्रारींसाठी संबंधितांनी विभागासाठी नियुक्त केंद्र समन्वयकांशी उपरोक्त क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे.