उरण येथे बुद्ध पोर्णिमा साजरी
उरण (दिनेश पवार)
बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.८४३ व माता रमाई महिला मंडळ उरण बौद्धवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार (दि. २६ ) रोजी भगवान गौतमबुद्ध यांची २५६५ वी जयंती बौद्धवाडी उरण येथे सरकारी नियमाचे पालन करून साजरी करण्यात आली . बौधाचार्य महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
यावेळी बौद्धजन पंचायत समिती उरण शाखा क्र.८४३ चे अध्यक्ष प्रकाश कांबळे, उपाध्यक्ष हरेश जाधव, महेंद्र साळवी, चिटणीस विजय पवार, सहचिटणीस रोशन गाडे, खजिनदार अनंत जाधव, सहखजिनदार सुरेश गायकवाड, सल्लागार विनोद कांबळे, बौधाचार्य महेंद्र साळवी, प्रमोद कांबळे, माजी नगरसेवक चिंतामण गायकवाड, मारुती तांबे, हरिचंद्र गायकवाड, मोतीराम कांबळे, महेंद्र पेडणेकर, हर्षद कांबळे, जयेश कांबळे, जयेश कांबळे, आदी उपस्थित होते.