शेतकऱ्यांना बांधावर भात बियांना बरोबर खतांचे वाटप
उरण (दिनेश पवार)
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर शासकीय नियमांचे पालन करत उरण तालुक्यातील खोपटे-बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांना कृषी विभागातर्फे बांधावर भात बियांना बरोबर खतांचे वाटप तालुका कुषि अधिकारी श्रीमती शर्मिला जाधव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांनी भात बियाणे खरेदी करण्यासाठी आपली उपस्थिती लावली होती.
कुषि अधिकारी श्रीमती शर्मिला जाधव यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की नूकताच चक्रीवादळामुळे अवकाळी पाऊस पडला आहे. हा पाऊस पेरणी योग्य नाही. जून महिन्यात येणा-या पावसाळ्यात प्रत्येक शेतकऱ्यानी आप आपल्या शेतात भात बियांनाची पेरणी करावी. तसेच तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सुचनांचे प्रत्येक शेतकऱ्यानी पालन करत शेतीच्या मशागतीच्या कामांना सुरुवात करावी.अशा मशागतीच्या कामांमूळे निश्चितच खोपटा,कोप्रोली या परिसरातील गोऱ्या व खाऱ्या पाण्याचे मिश्रण असलेल्या शेतजमीनीत भाताचे पीक मुबलक प्रमाणात येईल, तसेच शेतकऱ्यांनी नैसर्गिक खतांचा वापर करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे ही आवाहन शेवटी कुषि अधिकारी श्रीमती शर्मिला जाधव यांनी केले.
याप्रसंगी तालुका कृषी पर्यवेक्षक एन.वाय. घरत, कृषी सहाय्यक एस.एस. अंबुलगेकर, बांधपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच विशाखा ठाकूर यांनी श्रीमती शर्मिला जाधव यांचे कौतुक केले.