महाराष्ट्र

भांडूप परिमंडलातील सर्व गावांना प्रकाशमान करून अभियंते व कर्मचाऱ्यांनी केली रत्नागिरी व वसई कडे कूच

भांडूप, दि. २२.०५.२०२१ :

‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा महावितरणच्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोकण, ठाणे, नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे व पालघर जिल्ह्यातील अनेक गावांना बसला आहे. या चाक्रीवादळामुळे महावितरणची वीज यंत्रणाही प्रभावित झाली असून अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मा. ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या बाधित झालेल्या क्षेत्रात वीजपुरवठा सुरु करण्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व साहित्याची उपलब्धता त्वरित करून, ग्राहकांचा वीजपुरवठा लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश दिले होते.

तौक्ते चक्रीवादळामुळे कल्याण परिमंडलातील पालघर, वसई व विरार तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील भागाची परिस्थिती दयनिय झाली आहे. विस्कळीत झालेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या भांडूप परिमंडलातील ११ अभियंते प्रतिनियुक्तीवर रत्नागिरीला, तर ६ अभियंते प्रतिनियुक्तीवर कल्याण परिमंडलातील वसई येथे अगोदरच पाठविले आहेत. तौक्ते चक्रीवादळामुळे, मागील दोन-तीन दिवस महावितरण भांडूप परिमंडलचे अधिकारी व कर्मचारी आपल्या भागातील वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा कामासाठी अथक परिश्रम करीत होते. त्यांच्या या अविश्रांत प्रयत्नांमुळे भांडूप परिमंडलातील १०० टक्के गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात महावितरणला यश आले आहे.

मा. ऊर्जा मंत्र्यांनी डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.विजय सिंघल व संचालक (संचलन) श्री. संजय ताकसांडे यांनी रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर जिल्ह्यात अधिक मनुष्यबळ पाठवण्यासाठी सर्व परीमंडलांना सूचना दिल्या. त्यामुळे, परत २० अभियंते व १६० तांत्रिक कामगार वसईकडे रवाना झाले आहेत. यासाठी, भांडूप परिमंडलचे मुख्य अभियंता श्री. सुरेश गणेशकर यांनी रत्नागिरी व वसई येथील कामासाठी मदत करण्याचा हेतूने आपले अभियंते प्रतिनियुक्तीवर पाठवण्याचा निर्णय घेतला. “दोन हाथ अधिक जोडले गेले तर वीज यंत्रणेतील दुरुस्तीच्या कामांना वेग येईल. तसेच वेळ आल्यास आपण सहकारी म्हणून मदत केली पाहिजे”, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button