सुकापूर (पाली देवद) हद्दीत पावसाळापूर्व कामांना सुरुवात
पनवेल: सुकापूर (पाली देवद) ग्रामपंचायत हद्दीत पावसाळापूर्व कामांना सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी ग्रामपंचायत सरपंच योगिता राजेश पाटील, अशोक पाटिल, राजेश पाटील, महेश पाटील, ग्रामसेवक नंदकिशोर भगत यांच्यासह सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत पाली देवद हद्दीतील सर्व अंतर्गत गटारे मोठ्या प्रमाणात गाळाने भरल्यामुळे पावसाळ्यापूर्वी या गटारामधील गाळ साफ करणे आवश्यक आहे. यासंदर्भातील मासिक सभा नुकतीच पार पडली आहे. पावसाळ्यापूर्वी कामांना ग्रामपंचायत तर्फे सुरुवात करण्यात आलेली आहे. गटारे, रस्त्यांच्या कडेला असलेली कचरा, माती उचलून स्वच्छता केली जात आहे. मौजे पाली देवद, शिलोत्तर रायचुर, भगतवाडी, विमल वाडी, मालेवाडी, एक्सप्रेस हायवे शेजारील गटारातील नालेसफाई करण्यात येत आहे. पावसाळ्यापूर्वी कामांना सुरुवात करण्यात आल्याने पावसाळ्यातील पाणी साचणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.