फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्सच्या माध्यमातून अभय वाघमारे यांनी घेतली आयुक्त अभिजित बांगर यांची भेट
ऑगस्ट-सप्टेंबरच्या दरम्यान कोव्हीडची संभाव्य तिसरी लाट येण्याची शक्यता नामांकीत आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे. हि कोव्हीडची तिसरी लाट लहान मुलांना धोकादायक असू शकते असं तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. त्या अनुषंगाने फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्सच्या माध्यमातून अभय वाघमारे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर साहेबांशी भेटून लहान मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी व्यायामाचा योग्य तो प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे, या बाबतीत सकारात्मक चर्चा केली.
नवी मुबई वार्ताशी बोलताना अभय वाघमारे यांनी सांगितले कि गेल्या वर्षांपासून मुले घरात आहेत. त्यांची मानसिक तसेच शारिरीक स्थिती खूप ढासळलेली आहे. संचारबंदी असल्याने बाहेर मुले जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांचा शारिरीक व्यायाम होत नाही. घर बसल्या सायन्टिफिक दृष्ट्या मुलांना योग्य व्यायाम प्रकार कसा माहिती होईल ह्यासाठी फ्युचर फर्स्ट अकॅडमी – फिटनेस फॉर जनरेशन्स मदत करेल.
कोव्हीडच्या तिस-या लाटेला सामोरे जाण्यासाठी नवी मुंबई महानगरपालकेचे नियोजन सुरु आहे. येणाऱ्या काळात पालिकेमार्फत याबाबत लवकरचं उपाययोजना आखण्यात येणार आहे व पालिका प्रशासन तांत्रिकदृष्ट्या फ्युचर फर्स्ट अकॅडमीच्या अनुभवाचा फायदा नक्की घेईल, असे आश्वासन आयुक्त अभिजित बांगर यांनी दिले.