नवी मुंबई
खासदार राजन विचारे साहेबांचा पाहणी दौरा: सोबत माजी जेष्ठ स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील व इतर शिवसेना पदाधिकारी तसेच सिडकोचे कार्यकारी अभियंता कल्याण पाटील
काल झालेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे तुर्भे तसेच ऐरोली रेल्वे स्थानकातील पत्रे उडून गेल्याचे वृत्त कळताच आज तुर्भे रेल्वे स्थानकात सिडकोच्या अधिकाऱ्यांसमवेत खासदार राजन विचारे साहेबांनी पाहणी केली.
यावेळी सिडकोच्या अधिकाऱ्यांना ही कामे तातडीने करून घेण्याचे आदेश खासदार राजन विचारे साहेबांनी दिले. तुर्भे रेल्वे स्थानकाबाहेर ठाणे-बेलापूर मार्गावर रिक्षा स्टॅन्ड असल्याने वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो यातून सुटका मिळवण्यासाठी तुर्भे स्थानकाच्या संरक्षण भिंतीतून गेट तयार करून रिक्षा स्टॅन्ड तुर्भे रेल्वेस्थानकाच्या आत घेण्यासाठी सिडकोने तात्काळ परवानगी द्यावी यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली व हे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश सिडको प्रशासनाला दिले.