४ ऑगस्ट रोजी नवी मुंबई वार्ताने ‘मयत महिलेच्या नातेवाईकांचा शोध होणेकामी’ ह्या शीर्षकाखाली बातमी दिली होती. वाशी पोलिसांनी काही धागा-दोरा नसताना शिताफीने आरोपीला पकडून खूनाच्या गुन्हयाची उकल केल्याबद्दल वाशी पोलीसांचे अभिनंदन!
वाशी पोलीस ठाणे हद्दीत दिनांक ०२/०८/२०२१ रोजी सकाळी ०९.०० वा. पामबीचकडुन येणा-या ब्रिजखाली मनुष्य जातीचा मृतदेह अर्धवट गोणीत भरलेल्या स्थितीत असल्याचा संदेश वाशी पोलीस ठाण्यास प्राप्त झाला होता. त्यावरून पोलीस पथक घटनास्थळी पोहचताच इनऑर्बिटच्या पाठीमागील पामबीच कडुन येणा-या ब्रिजखाली अर्धवट शरीर गोणीत तर पाय बाहेर अशा स्थितीत अंगावरील कपडे मृतदेहापासुन वेगळे काढुन मृतदेहावर गुंडाळलेले अशा आळया (कीडे) पडलेला, दुर्गंधी सुटलेला मृतदेह मिळुन आला. मृतदेह गोणीतुन बाहेर काढुन त्याचा इन्क्चेष्ट पंचनमा करता मृतदेहावरील आळ्या (कीडे) पडलेल्या, मृतदेह सडलेल्या स्थितीत तसेच चेहरा पुर्णपणे सडलेला व ओळखण्या जोगा नसल्याचे व स्त्री जातीचा असल्याचे दिसुन आले. मृतदेहाच्या गळयावर कापल्याची जखम तसेच चेह-यावर व डोक्यावर गंभीर जखमा असल्याने नमुद महीलेचा कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी खून केल्याचा वाशी पोलीस ठाणे गु.र.नं २५१/२०११ भादवि कलम ३०२, २०१ अन्वये दिनांक ०२/०८/२०२१ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला.
प्राथमिक तपास:
सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मनपा रूग्णालयात पाठविला असता तो स्वच्छ धुवुन पाहीला असता त्याचे दोन्ही हातावर विशिष्ठ प्रकारची डिझाईन गोंदवलेली दिसुन आली. त्याव्यतिरीक्त कोणतेही नाव, पत्ता ओळखण्या इतपत चिजवस्तु, कागदपत्रे मिळुन आले नाहीत. त्यावरून घटनास्थळी मिळालेल्या वस्तु पायातील प्लास्टीक चप्पल मृतदेहाची साडी, ब्लाउज याव्यतिरीक्त कोणतेही ओळख पटवण्याचे साधन पोलीसांकडे नसताना मृतदेहाची हातावरील गोंदण (Tatto) हाच एक धागा आशादायी वाटत होता. त्यावरून मृतदेहाची ओळख पटवणे ही पहीली पायरी व नंतर खुनाचा गुन्हा उघडीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पो.नि. प्रमोद तोरडमल यांचे नेतृत्वाखाली पथके तयार करण्यात आली. त्यामध्ये मिसिंग प्रकरणाची माहीती घेण्यासाठी मुंबई शहर, ठाणे शहर व नवी मुंबई शहरातील पोलीस ठाण्यामध्ये पोलीस पथकांनी जावून मृतदेहाशी मिळत्या-जुळत्या वर्णनाची महीला मिसींग प्रकरणे वेगवेगळी करून त्याचा अभ्यास केला. त्यावेळी मृतदेहाशी मिळत्या-जुळत्या वर्णनाची मिंसीग प्रकरण गोंवडी पोलीस ठाण्यात नोंद असल्याचे दिसुन आले. परंतु मिसींग महीलेचे वय अंदाजे ७० वर्षे तर मृतदेहाचे वय प्राथमिकताः ३५ ते ४० वर्षे, वाटत असल्याने त्याची ओळख पटविणेकामी नातेवाईकाचा पाठपुरावा करून त्यांना मृतदेहाजवळ मिळालेले कपडे साडी, ब्लाउज, चप्पल दाखविले असता ते ओळखले असुन गोंदण्याच्या डिझाईनवरून त्यांनी मृतदेह त्यांचे आईचा म्हणजेच गोंवडी पोलीस ठाणे मिसींग ३०/२०२१ मधील महीला नामे बबनबाई शांतीवन कांबळे वय ७० वर्षे, यांचा असल्याचे ओळखले आहे.
पथकाचे निरिक्षण व कौशल्य:
मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर नमुद महीलेचा नेमका वावर वाशी भागात कधी होता. या दृष्टीने वाशी टोलनाका, हायवे, वाशी स्टेशन, इनॉर्बिट मॉल व शहरातील इतर ठिकाणांचे अनेक कॅमे-यांचे इतर ठिकाणाचे कॅमे-यांचे फुटेज तपासले असता दिनांक २९ / ७ / २०२१ रोजी सायंकाळी नमुद महीला एकटीच इनॉर्बिट सिंग्नलच्या आसपास वावरताना दिसली. परंतु रात्रौ ०९.७० वा. चे सुमारास सदर महीलेबरोबर एक पुरूष चालत असल्याचे दिसले. सदर संशयीत पुरूष इसमाचा चेहरा स्पष्टपणे दिसत नसतानाही त्याच्या शारिरीक हालचाली वरून मागील दिवसांचे फुटेज तपासले असता आठ ते दहा दिवसाच्या अगोदरच्या फुटेजमध्ये संशयीत इसम हा त्याचा फोटो ओळखण्या इतपत दिसत असल्याने सदरचा फोटो वाशी परिसरातील, हायवेवरील हॉकर्स, भिकारी, रस्त्यावर झोपणारे, रिक्षा चालक अशा शेकडो लोंकाना दाखविले. त्यादरम्यान खात्रीशिर माहीती मिळाली की फुटेजमधील इसम हा डोक्याचे केस उडविणे, मान वरती करणे, चालताना पाय झटकने, अशा विशिष्ठ हालचाली करत असल्याचे समजले. त्यावरून वरील लोंकापैकी खास इसमाकडून सदर संशयित इसम दिनांक २१/०८/२०२१ रोजी दुपारी हावरे फंन्टासीयाजवळ पुलाखाली आल्याचे समजले. त्यावरून पाळतीवर असलेल्या पोलीस पथकाने तात्काळ हालचाली करून शिताफीने ताब्यात घेतले.
आरोपीची माहिती:
कानीफनाथ दिलीप कांबळे, वय २६ वर्षे, रस्त्यावर राहणारा असून मुळगाव शेडोळ ता. निलंगा, जि. लातुर
खूनाचे कारण व तपास:
त्याचेकडे केलेल्या कौशल्यपूर्ण तपासात त्याने मयत महीलेस रात्री जेवणाचे पदार्थ देवुन जेवणासाठी घेवुन जात असल्याचे सांगुन बोलत बोलत इनॉर्बिट समोरील ब्रिजच्या बाजुने चालत नेवुन त्यांच्याशी पुलाखाली अतीप्रसंग करण्यास सुरवात केली. त्यावेळी मयत महीलेने विरोध करून पायाने ढकलुन दिले असता तेथे बाजुला पडलेल्या काचेच्या तुकडयाने महीलेच्या गळ्यावर वार करून तसेच बाजुच्या दगडाने तोंडावर, डोक्यावर मारून गंभीर जखमी केले व त्या निपचीत पडताच बाजुच्या कचरा कुंडीतुन गोणी आणुन त्यामध्ये डोक्याकडील बाजुने अर्धवट भरले व तेथुन पळुन जावुन अस्तित्व लपवित इतर ठिकाणी फिरत असल्याचे त्याने सांगितले. त्याचा गुन्हयातील सहभाग निष्पन्न झाल्यावरून त्यास अटक करून दिनांक २२/०८/२०२१ रोजी मा. वाशी न्यायालयासमोर रिमांडकामी उपस्थित करता त्यास दिनांक २७/०८/२०२१ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवी मुंबई पोलीस:
सदरची यशस्वी कामगिरी मा. पोलीस आयुक्त श्री. बिपीनकुमार सिंह, मा. पोलीस सह. आयुक्त डॉ. जय जाधव, मा. पो. उप आयुक्त, परिमंडळ- १, वाशी, श्री. सुरेश मेंगडे, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री. विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रमेश चव्हाण, तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद तोरडमल (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन ढगे, पोलीस उपनिरीक्षक योगेश परदेशी, सहा. पो. उपनिरीक्षक राजेंद्र मेंगडे, पोलीस हवालदार – शैलेंद्र कदम, संजय भाले, रवि पाटील, पोलीस नाईक – सुनिल चिकणे, विनोद वारीगे, चंदन म्हसकर, महेश जाधव, राजकुमार दुधाळ, पंकज शिंदे, संदीप म्हात्रे, पोलीस अंमलदार – गोकुळ ठाकरे, दिलीप ठाकुर, केशव डगळे, अमृत साळी, नितीन जावरे यांनी यशस्वीपणे पार पाडलेली आहे.