नवी मुंबई

23 सप्टेंबर पासून नमुंमपा परिवहन उपक्रमाच्या वाशी व सिबीडी या बस स्थानकातील पास सेंटर सुरू

देशात कोरोना (COVID-19) या विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्याने दि.25 मार्च 2020 रोजी पासून केंद्र शासनाने संपूर्ण देशात टाळेबंदी (LOCK DOWN) लागू केलेली होती. नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम अत्यावश्यक सेवेत येत असून कोरोना (COVID-19) या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या निर्देशनुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी परिवहन उपक्रमाचे बस संचलन अतिअल्प प्रमाणात सुरू ठेवण्यात आले होते. त्यामुळे परिवहन उपक्रमाचे पास सेंटर बंद ठेवण्यात आले होते.

तथापि सद्यस्थितीत सर्वसामान्य प्रवाशी जनतेसाठी सार्वजनिक बस सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सुचित केले असल्याने नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत टप्प्या टप्प्याने बसेस मध्ये वाढ करून संपूर्ण बस मार्गावरील बससंचलन पूर्ववत करण्यात येत आहे. याच उपाययोजनांचा भाग म्हणून दि. 23 सप्टेंबर 2021 रोजीपासून परिवहन उपक्रमाच्या वाशी व सिबीडी या दोन बस स्थानकातील पास सेंटर पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. हे पास सेंटर रविवार व सार्वजनिक सुट्टी व्यतिरिक्त इतर दिवशी सकाळी 08.00 ते सायंकाळी 04.00 या वेळेत सुरू राहील. सर्व सामान्य प्रवाशी जनतेसाठी तुर्भे, वाशी व सिबीडी बस स्थानक येथील पास सेंटरद्वारे मासिक, त्रैमासिक, वार्षिक इ.प्रकारचे बस पास व जेष्ठ नागरिकांना प्रवास भाडयात देण्यात येणारे सवलतीचे तसेच दिव्यांगासाठी देण्यात येणारे मोफत प्रवासाचे पास उपलब्ध होतील. तरी सदर सेवेचा लाभ सर्व प्रवाशांनी घ्यावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button