“२०,४६,०००/ – रुपये किमतीचा गुटखा जप्त”
एनआरआय सागरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये गुटख्याचा विक्रीसाठी साठा करून ठेवलेल्या इसमाविरूद्ध गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करून “२०,४६,०००/- रू किमतीचा गुटखा जप्त” केला.
दि. ०६/०७/२०२१ रोजी पोहवा / १२०२ कासम दस्तगीर पिरजादे यांना त्यांचे गुप्तबातमीदारांकडून मिळालेल्या बातमीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . जयराज छापरीया यांना दिली असता त्यांनी तात्काळ मा. अपर पोलीस आयुक्त सो. गुन्हे, नवी मुंबई, मा. पोलीस उप आयुक्त सो. गुन्हे शाखा व सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा यांना सांगितली. त्यांनी सदरची बाब गंभीरपणे घेवुन मार्गदर्शनपर सुचना देवुन वपोनि जयराज छापरीया यांना कारवाई करण्यास सांगितले.
त्यानुसार वपोनि जयराज छापरीया यांनी, सपोनि. विजय चव्हाण, सपोनि अश्विनी कुसुरकर, पोहवा / १२०२ पिरजादे, पोहवा / ५७८ गायकवाड, पोहवा / ५२२ महेश शेट्टे, नेमणूक- ए.एच.टी.यु. कक्ष, पोहवा / ४४ तुकाराम सुर्यवंशी नेमणूक – गुन्हे शाखा, कक्ष २, पोना / १८३५ राजेश सोनावणे नेमणूक – मोटार वाहन कक्ष, पोशि / ३२१६ राहुल वाघ नेमणूक – मध्यवर्ती कक्ष व ए.एच.टी.यु. कक्षाचे चालक पोहवा / ९७२ देवमन पवार असे मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी एनआरआय सागरी पोलीस ठाणे हद्दीतील शॉप नंबर १, लक्ष्मी किराणा स्टोअर्स, धनलक्ष्मी अपार्टमेंट, सेक्टर ३६, गणेश मैदानाजवळ, करावेगाव, सीवुड, नवी मुंबई येथे प्लाझो अपार्टमेंट, रूम नंबर ००१, शांताराम विठ्ठल स्मृती, प्लॉट नंबर ८७३, सेक्टर ३६, सिवूड, नवी मुंबई येथे छापा टाकला असता सदर दोन्ही ठिकाणी एकूण २०,४६,००० / – रू किमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखू असा प्रतिबंधित मुद्देमाल मिळून आला.
सदर गुन्हयात इसम नामे राजूराम आसाराम देवासी वय २०, धंदा – किराणा दुकान, रा. शॉप नंबर १, लक्ष्मी किराणा स्टोअर्स, धनलक्ष्मी अपार्टमेंट, सेक्टर ३६, गणेश मैदानाजवळ, करावे गाव, सीवुड, नवी मुंबई यास अटक करून एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मा. पोलीस आयुक्त सो. नवी मुंबई, मा. अपर पोलीस आयुक्त सोो. गुन्हे, नवी मुंबई यांच्या आदेशाने व पोलीस उप आयुक्त गुन्हे, व सपोआ गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ व गुटखा विक्री विरोधात विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
जाहिरात