14 वर्षांनी माजी विद्यार्थ्यांची दिल, दोस्ती, दुनियादारी
चिरनेरच्या सेंकडरी स्कूलमधील 2008 सालातील दहावीचे विद्यार्थी आले एकत्र:
उरण तालुक्यातील चिरनेरच्या सेकंडरी स्कूलमधील 2008 सालच्या दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थी तब्बल 14 वर्षांनी एकत्र आले होते. निमित्त होते ते स्नेहमेळाव्याचे. यावेळी शाळेतील स्मृती जागवताना प्रत्येकाचा तोच जोश, तोच उत्साह आणि तो खोडकरपणा अधोरेखित होताना, पुन्हा दहावीचा वर्ग भरविण्यात आला.
शालेय जीवन संपले की, शाळेतील मित्रवर्ग उच्च-शिक्षण, नोकरी-धंदा या कारणांमुळे विखुरले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात शाळेच्या आठवणी, मित्रांच्या आठवणी असल्या तरी सर्व एकत्र येणे अशक्य असते. त्यात सासांरिक प्रपंच वाढल्याने सर्वचजण व्यस्त होतात. त्यामुळे 2008 साली शिकत असलेल्या चिरनेरच्या सेंकडरी स्कुलमधील माजी विद्यार्थ्यांनी स्नेहमेळावा घेवून एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
शाळेतील स्नेहल अनिल जाधव, रोशन पाटील व किरण पाटील यांनी पुढाकार घेऊन व्हाट्सअपच्या माध्यमातून सर्व मित्र-मंडळींशी संपर्क करून त्यांना स्नेहमेळाव्यासाठी तयार केले.
अभय पाटील यांच्या वतीने झाडे देण्यांत आली व चिरनेर येथील बापुजी देव मंदिर परिसरात वृक्षारोपण सर्वांच्या हस्ते करण्यांत आले.
दिघोडे येथील रिव्हर व्हिव रिसोर्ट येथे सर्व मित्रमंडळी एकत्र जमले. तब्बल 14 वर्षांनंतर 35 वर्ग मित्र मैत्रिणी जमा झाल्याने त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. त्यातील सर्व वैवाहिक जीवनात व्यस्त झाले असतानाच काहीजण आजी आजोबाही झाले आहेत. मात्र एकत्र आल्यावर प्रत्येक जण 14 वर्षापूर्वीच्या उत्साहात, त्याच जो एकमेकांची मस्ती करत होते.
गीत गायन, वात्रटिका, विनोदांमुळे रंगत अली होती. या माजी विद्याथ्र्यापैकी काही डॉक्टर, इंजिनिअर, कंपनीत अधिकारी, पोलीस असून काही वर्गमित्र गावातच लहानमोठे व्यवसाय करीत आहेत. मात्र स्नेहमेळाव्यात एकत्र येताच याचे भान न ठेवता प्रत्येक जण दहावीत असल्यासारखी मजा मस्ती करत होते. शाळेतील मधुर आठवणींमध्ये प्रत्येकजण गुंतून गेला होता. यावेळी अनेकांनी गीत गायन, वात्रटिका, विनोद सादर करून स्नेहमेळाव्यात रंगत आणली. सहभोजनानंतर गप्पांचा फड रंगला.