वाडा तालुक्यातील आदिवासी बांधवांना होळी निमित्त जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप
राज्य शिक्षण क्रांती संघटना व जर्नालिस्ट वेलफेअर असोशियशन नवी मुंबईचा उपक्रम
नवी मुंबई: जग आधुनिकतेकडे झुकले असताना देखील आजही काही भागात पोटभर जेवण मिळत नाही. त्यामध्ये राज्यातील पालघर या आदिवासी बहुल जिल्ह्यात तर कुपोषणाचा प्रश्न आजूनही ताजा आहे. या बाबींचा विचार करून राज्य शिक्षण क्रांती संघटना व जर्नालिस्ट वेलफेअर असोशियशन नवी मुंबईच्या वतीने येणाऱ्या होळी सणाचा विचार करत वाडा तालुक्यातील सोनाळे गावात साठ आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे व धान्य वाटप करण्यात आले.
सोनाळे गावातील देवराम घागस व सुनीता घागस यांच्या घरासमोर असलेल्या प्रशस्त मैदानावर जीवनावश्यक वस्तू व धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी स्वतः ज्येष्ठ नागरिक देवराम घागस, सुनीता घागस, सरपंच अरुणा गुरोडे, उपसरपंच पंढरीनाथ मराडे, शिक्षण क्रांती संघटनेचे राज्य सचिव एस.जी.पाटील, पालघर जिल्हा सचिव सुरेंद्रनाथ दुसाने, वाडा तालुका उपाध्यक्ष राहुल पाटील, भाजप तालुका सचिव राजेश रिकामे आयोजक राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे अध्यक्ष सुधीर घागस व जर्नालिस्ट वेलफेअर असोशियशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रथमतः धान्य वाटप ज्येष्ठ नागरिक देवराम घागस व त्यांच्या पत्नी सुनीता घागस यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आदिवासी बांधवाच्या चेहऱ्यावरील हास्य ओसंडून जात होता.त्यांना दिलेल्या धान्य विषयी त्यांनी आनंद व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.
Very good 🙂
Thank you for spending your presious time for comending us.