पालिका कर्मचारी, पालिका शिक्षक, आरोग्यसेविका यांना सानुग्रह अनुदान मंजूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला यश
पनवेल : 2021 च्या दीपावली सणानिमित्त पालिका अधिकारी, कर्मचारी, कामगार यांना सानुग्रह अनुदान मिळावे आणि सर्वसाधारण सभेत प्रस्ताव सादर करावी ही मागणी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी पालिकेचे आयुक्त यांच्याकडे केली होती.
पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिका कर्मचारी, पालिका शिक्षक, आरोग्य सेविका यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे.
भारताच्या सर्व सणांतील दिवाळी हा सण लोकांना आनंदाने,उत्साहाने भरपूर करतो. दीपावलीचे चार दिवस हा आनंद दुथडी भरून वाहतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पालिकेत काम करणारे सर्व कर्मचारी वर्गास दीपावली सण गोड व्हावा याकरता सानुग्रह अनुदान देण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे, नगरसेविका डॉ सुरेखा मोहोकर, नगरसेविका प्रीती जॉर्ज, नगरसेविका सारिका भगत यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. पनवेल महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पालिका कर्मचारी, पालिका शिक्षक, आरोग्य सेविका यांना सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या विषयाला सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाल्याबद्दल विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांनी समाधान व्यक्त केले.